पुणे : महाराष्ट्रात कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. दररोज शेकडो लोकांचा कोरोनामुळे प्राण जातोय. अर्ध्या लाखापेक्षाही जास्त लोकांना दररोज कोरोनाची बाधा होत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पण पुण्यात एका फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनची खिल्ली उडवण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन असताना तिथे पार्टी आयोजित करण्यात आली. त्यानंतर पार्टीच्या नावाखाली तिथे सर्रासपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. शेजारच्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला (Pune Police bust dance party at farmhouse).
नेमकं प्रकरण काय?
समीर ऊर्फ नितेश पायगुडे या इसमाने लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पुण्याजवळ लबडे फार्महाऊसवर सहा तरुणींना फोन करुन बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर काही लोकांना इथे मजा-मस्ती करण्यासाठी बोलावण्यात आलं (Pune Police bust dance party at farmhouse).
डीजेच्या आवाजात मोठ्या उत्साहात पार्टी
फार्महाऊसमध्ये दारुसोबतच नाच-गाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. आरोपीने या पार्टीत येणाऱ्यांसाठी विदेशी मद्य मागावले होते. त्यानंतर पार्टी सुरु झाली. डीजेच्या आवाजात मोठ्या उत्साहात पार्टी सुरु झाली. यावेळी पार्टीसाठी बोलावलेल्या तरुणांचा डान्स सुरु झाला. तरुणींवर पैशांचा पाऊस पडू लागला. यावेळी फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय देखील सुरु होता.
पोलीस दाखल होताच पळापळ
फार्महाऊसवर सुरु असलेल्या नंगानाचचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलीस तिथे दाखल झाले. पोलीस दाखल होताच फार्महाऊसमध्ये गदारोळ सुरु झाला. आतमधील लोकांची धावपळ सुरु झाली. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाची भयानक परिस्थिती
राज्यात कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. दररोज 60 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळत आहेत. दररोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. परिस्थितीत हाताळण्यात प्रशासन देखील आता अपुरं पडू लागलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन पुढच्या 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. पण अजूनही काही लोक या परिस्थितीला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.
संबंधित बातमी : भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक