मुंबई : दिल्ली येथील श्रद्धा हत्याकाडानंतर संपूर्ण देश हदारलेला असताना मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीपीपो कर्मचारी असलेल्या मैत्रिणीला तिच्याच बॉयफ्रेंड असलेल्या अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ठार मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. यामध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मारहाण करत धक्का दिला आहे. त्यात ती सुदैवाने वाचली असली तरी तिचे मनके फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार 30 महीने तिला रिकव्हर होण्यासाठी लागतील अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या एका मित्राला पोलीसांनी जबाबासाठी बोलावले आहे.
दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांड समोर आल्यानंतर मुंबईतही संतापजनक घटना समोर आली आहे, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला चक्का पंधरा मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरुन ढकलुन दिले आहे.
यामध्ये पीडित तरुणी ही गंभीर जखमी झाली असून तिचे मनके फ्रॅक्चर झाले असून तिला बरे होण्यासाठी कमीत कमी 30 महीने लागणार आहे.
पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या मित्राला देखील ताब्यात घेतले असून अधिकचा तपास केला जात आहे.
पीडित तरुणीला कोकिलाबेन अंबानी या रुग्णालयात उपचार दिले जात असून तीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
ही घटना रविवारी घडली असून तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पीडित मुलगी आणि तीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर हे काही दिवसापासून सोबत राहत होते, दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेम होते, मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेलेले असतांना ही घटना घडली आहे.
दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला होता, त्यात पीडित तरुणी 15 मजल्यावरील 18 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली होती.
तिथे तिचा बॉयफ्रेंड आल्यावर दोघांमध्ये वाद झाला, वादात त्याने तिला मारहाण केली याच वेळी तिला त्याने जोराचा धक्का दिला त्यात ती पाण्याच्या टाकीवरवरुण छतावर पडली त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.