लखनौ : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यात एक अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. येथे बलात्कार (Rape) आणि अपहरणाचा आरोप असलेल्या तसेच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीच्या वडिलांनी सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या आरोपीच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला संपवलंय (Murder). दिलशाद हुसैन असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा न्यायालयाच्या आवारात जागेवरच मृत्यू झाला. तर बलात्कार पीडित मुलीचे वडील निवृत्त सैनिक असून त्यांना पोलिसांनी अटक केलं आहे. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार मृत दिलशाद हुसैन उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिभीपुरा येथे वास्तव्यास होता. तो येथे पंक्चरचे दुकान चालवायचा. याच भागात 11 फेब्रुवारी 2020 साली एका निवृत्त सैनिकाच्या मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात आरोपी दिलशाद हुसैनला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केले होते. यावेळी पोलिसांनी हुसैनविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच अपहणाचा गुन्हा दाखल केला होता. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे आरोपी हुसैन मागील दोन वर्षांपासून तुरुंगात होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.
यावेळी शुक्रवारी म्हणजेच 21 जानेवारी रोजी याच बलात्कार प्रकरणात गोरखपूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. आरोपी सुनावणीसाठी आला असता बलात्कार पीडितेच्या वडिलांनी त्याच्यावर धाड धाड दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी आरोपीच्या थेट डोक्याच्या आरपार गेली आणि यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, न्यायालयाच्या आवारातच हत्या झाल्यामुळे येथील वकील आक्रमक झाले होते. विकिलांनी मृतदेह उचलण्यास विरोध केला. मात्र न्यायाधीशांनी हस्तक्षेप केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर आरोपीने आपला गुन्हा गबुल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
इतर बातम्या :
Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु
औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप!