Treadmill Death | ट्रेडमिलवर धावताना घात झाला, ह्दयविकार नाही, दुसऱ्याच कारणामुळे जीव गेला

| Updated on: Jul 20, 2023 | 4:09 PM

Treadmill Death | नेमकं काय झालं? जीम मालकाला अटक. ट्रेडमीलवर धावताना किंवा चालताना ह्दयविकाराच्या झटक्याने किंवा कार्डिअक अरेस्टने मृत्यू झाले आहेत.

Treadmill Death | ट्रेडमिलवर धावताना घात झाला, ह्दयविकार नाही, दुसऱ्याच कारणामुळे जीव गेला
Saksham Pruthi
Follow us on

नवी दिल्ली : जीममध्ये व्यायामासाठी ट्रेडमील मशीनचा वापर होतो. अनेक जण ट्रेडमीलवर धावण्याचा, चालण्याचा सराव करतात. अलीकडे ट्रेडमीलवर व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. ट्रेडमीलवर धावताना किंवा चालताना ह्दयविकाराच्या झटक्याने किंवा कार्डिअक अरेस्टने मृत्यू झाले आहेत. उत्तर दिल्लीतील रोहिणी येथील एका जीममध्ये मंगळवारी एका तरुणाचा ट्रेडमीलमुळे मृत्यू झाला.

धावताना किंवा चालताना ह्दयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाला नाही. यामागे कारण दुसरचं आहे. या प्रकरणात जीम मालकाला अटक झाली आहे.

सक्षम बी टेक पदवीधर

ट्रेडमीलवर व्यायाम करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणात जीम मालकावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. सक्षम प्रृथी असं मृत तरुणाचा नाव आहे. तो 24 वर्षांचा आहे. बी टेक पदवीधर असलेला सक्षम गुरुग्रामच्या एका कंपनीत नोकरीला होता.

बसला तिथेच कोसळला

सक्षम रोहिणी सेक्टर 19 मध्ये राहतो. सेक्टर 15 मधील जीमप्लेक्स फिटनेस झोन या व्यायामशाळेत तो व्यायामाला जायचा. मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. सक्षम त्यावेळी जीममधील ट्रेड मीलवर धावत होता. व्यायाम केल्यानंतर विश्रांतीसाठी म्हणून तो खाली बसला. पण लगेच तिथे कोसळला.

जीम मालकाच्या दुर्लक्षामुळे घटना

सक्षमला लगेच रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शवविच्छेदनातून विजेचा झटक्यामुळे मृत्यू झाल्याच कारण समोर आलं. पोलिसांनी कुटुंबीयांना याची माहिती दिली. जीम मालकाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, असं सक्षमच्या आईने सांगितलं.