पुणे – शहरातील सहकार विभागातील सहनिबंधक महिला अधिकाऱ्याकडून पुण्यातील मनसेचे पदाधिकारी मनोज निकम यांच्यावर दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याने निकम यांना बघून घेईल, अशी दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी मनोज निकम यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
निकम यांनी दिलेल्या अर्जाचे वाचन करत असताना संबंधित महिला अधिकारी म्हणाल्या ,’ तुम्ही अजिबात आवाज चढवून बोलू नका. आम्ही देवू शकतो शकतो पण तुम्ही म्हटलांना की निपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून , पण तुम्ही आधी मला सांगायला हवे होते की तुमचीपण तक्रार आहे’
यावर निकम यांनी ‘ तुम्हाला होत नसेल तर आम्हाला तसं लेखी उत्तर द्या, की आम्ही तुम्हाला न्याय देवू शकता नाही’, असे म्हटले.
त्यावर महिला अधिकाऱ्याने ‘आम्ही बोलेलो नाही अजून’, असे म्हटले
पुढे या महिला अधिकाऱ्यांने तुम्ही नीट रहा माझ्याशी. मी अजून काही बोललेले नाही , तुम्ही काही एक्स्ट्रा बोलू नका. तुम्ही अधिकाऱ्यांनाच ब्लॅकमेल करत आहात , तुम्ही आल्यापासून तुमचा आवाज वर आहे. तुम्ही एका अधिकाऱ्याची स्पष्टपणे बाजू घेताय अन दुसऱ्या अधिकाऱ्याला शिव्या देताय अक्षरश. अन मी बोलतेय नीट तर मला बघा मला धमकी देतायत हातवारे करताय असे म्हणत अरेरावी केल्याचे निकम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
‘समृद्धी’वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य
Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!