मुंबई: मनसुख हिरेन यांच्या संशायस्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मनसुख यांची हत्याच झाल्याचं उघड झालं असून या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसला यश आलं आहे. तसेच या प्रकरणाचं अहमदाबाद कनेक्शन असल्याचंही उघड झालं आहे. (Mansukh Hiren Death Case: Maharashtra ATS Officer Claims ‘Murder Mystery Solved’)
मनसुख हिरेन यांना 4 तारखेला रात्री 8.20 वाजता एक व्हॉट्सअॅप कॉल आला होता. मनसुख यांना आलेला हा शेवटचा कॉल होता. फोन करणाऱ्याने त्यांना तो गुन्हे अन्वेषण विभागाचा अधिकारी तावडे असल्याचं म्हटलं होतं आणि त्याने तावडेंना भेटायला बोलावलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करताना एटीएसने पूर्ण कॉल डेटा काढला. परंतु तरीही पोलिसांना काहीच लीड मिळत नव्हती. मनसुख हिरेन यांच्या फोनमधील सर्व कॉल डिलीट करण्यात आले होते. एटीएसने या सर्व कॉलची डिटेल्स काढली. परंतु त्यांच्या काहीच हाती लागले नाही. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप कॉलची डिटेल्स रिट्रीव्ह करण्यात आली. तेव्हा काही नंबर एटीएसच्या हाती लागले. मात्र त्यातील मनसुख यांना आलेला शेवटचा व्हॉट्सअॅप कॉल एटीएसला खटकत होता. त्यानंतर या नंबरची डिटेल्स काढण्यात आली. तेव्हा या कॉलचं कनेक्शन अहमदाबादशी असल्याचं दिसून आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एटीएस टीम अहमदाबादमध्ये
एटीएसच्या टीमने ही माहिती मिळाल्यानंतर थेट अहमदाबाद गाठले. एक बुकी हा नंबर वापरत असल्याचं एटीएसला समजलं आणि बुकी नरेश गोरचाही शोध लागला. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता असे पाच मोबाईल नंबर सचिन वाझेंना दिल्याचं त्याने सांगितलं. या पाच नंबरांपैकी एक नंबर वाझेंनी मनसुख यांच्या मारेकऱ्यांना दिला होता, असं एटीएसच्या तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
11 लोकांचा सहभाग
एटीएसने या पाचही नंबरची माहिती काढली आणि त्यावरून निलंबित पोलीस कर्माचारी विनायक शिंदेला अटक केली. शिंदे हा मनसुख यांच्या हत्येत सामिल असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. शिंदेने आपण तावडे बोलत असल्याचं सांगत मनसुख यांना भेटायला बोलावलं होतं. मनसुख यांच्या हत्येच्यावेळी गाडीमध्ये एकापेक्षा अधिक लोक होते. त्यात शिंदेही होता. बाकी सर्व फरार असून एटीएस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिलेटीनप्रकरणासह मनसुख हत्याप्रकरणापर्यंत या प्रकरणात एकूण 11 लोक सहभागी असून त्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Mansukh Hiren Death Case: Maharashtra ATS Officer Claims ‘Murder Mystery Solved’)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 22 March 2021https://t.co/dmhkh0Ca87
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या:
देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल
औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा पराभव!, ‘गड आला पण सिंह गेला’ – अब्दुल सत्तार
नाना पटोलेंना मंत्रिपद हवंय?; काँग्रेसच्या आतलं राजकारण काय?
(Mansukh Hiren Death Case: Maharashtra ATS Officer Claims ‘Murder Mystery Solved’)