ठाणे : मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर ज्यांची स्कॉर्पिओ सापडली होती, त्या मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह (ATS Team Recreate The Scene) मुंब्रा रेतीबंदर परिसरात 5 मार्च रोजी आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिल्यानंतर ATS ने मुंब्रा रेतीबंदर परिसरात येऊन हा संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 आणि 11 मार्च रोजी रात्री एटीएसच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर परिसरात येऊन हा क्राईम सीन रिक्रिएट केला, अशी सूत्रांची माहिती आहे (Mansukh Hiren Death Case Thane ATS Team Recreate The Scene At Mumbra Retibandar).
यावेळी खाडीला भरती आणि ओहोटी कधी येते, हे जाणून घेण्यासाठी हवामान विभागाचे तज्ञ या पथकासोबत उपस्थित होते. तसेच फॉरेन्सिक टीम सुद्धा या पथकासोबत उपस्थित होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एटीएसकडून अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकलेला नाही.
विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. डीसीपी राजकुमार शिंदे यांनी ठाण्यातील एटीएस कार्यालयात भेट दिल्यानंतर ठाण्यातील एटीएस कार्यालायतून वेगाने सूत्रे हलायला लागली.
हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी एटीएस अधिकाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एक पथक ठाण्यातील TJSB आणि ICICI या बँकांमध्ये जाऊन आल्याची माहिती आहे. या पथकाने हिरेन मनसुख याच्या बँक खात्यातील व्यवहारांचा तपशील घेतला.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
“मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही. धनंजय गावडेशी माझा संबध नाही. मी त्यांना ओळखतही नाही,” अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली आहे. तसेच सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केला होता. अशाप्रकारे पाळत ठेवल्याप्रकरणी वाझे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची भेट घेणार आहेत (Mansukh Hiren Death Case Thane ATS Team Recreate The Scene At Mumbra Retibandar).
दोन दिवसांपूर्वी हिरेन मनसुख यांची पत्नी आणि मुलाला चौकशीसाठी एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले होते. बराच वेळ त्यांची चौकशी झाली. हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी थेट सचिन वाझे यांच्यावर आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
एटीएसकडून मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी ठाण्यात पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबई एटीएसच्या जवळपास तीन ते चार टीम ठाण्यात तपास करत आहेत. यापैकी पहिले पथक एटीएस कार्यालयात आहे. तर आणखी एका पथकाने हिरेन मनसुखच्या दुकानाची रेकी केली. तिसरे पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात तपासासाठी गेले होते. याशिवाय, एटीएसच्या पथकांकडून अन्य भागांचीही रेकी सुरु असल्याचे समजते.
सचिन वाझे स्वत:हून ATS समोर हजर; 10 तास कसून चौकशी, धनंजय गावडेंबद्दल काय म्हणाले?https://t.co/TrQUlxpZp8 #SachinVaze #SachinWaze #ATS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 11, 2021
Mansukh Hiren Death Case Thane ATS Team Recreate The Scene At Mumbra Retibandar
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार