मुंबईः मुंबईतल्या ड्रग्स प्रकरणाच्या थेट संबंध आता कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात असणाऱ्या ढोलगरवाडी गावापर्यंत आढळून आलाय. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ढोलगरवाडी गावात जाऊन एका फार्महाऊसवर छापा टाकला आणि तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांच एमडी ड्रग्स जप्त केलंय. ड्रग्सचं लोण आता खेडेगावापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडालीय. या सगळ्या प्रकरणात एका बड्या वकिलाचा मुख्य आरोपी म्हणून सहभागी असून तो फरार आहे. तर दोन आरोपीना अटक करण्यात आलीय. ढोलगरवाडी गावात शेतात असणाऱ्या फार्महाऊसवर हे ड्रग्स बनवण्याचं काम केलं जातं होत. त्याची विक्री मुंबईसह इतर भागात केली जात होती अस उघडकीस आलंय.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने काही दिवसांपूर्वी एका ड्रग्स प्रकरणात एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे 50 ग्रॅम एमडी ड्रग्स सापडलं होत त्यानंतर तिच्या चौकशीदरम्यान हे ड्रग्स ढोलगरवाडी गावातून आलं असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी अधिकची माहिती घेऊन तीन पथक तयार केली. या पोलीस पथकांच्याया माध्यमातून ढोलगरवाडी येथील त्या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या मशनरी, ड्रायर आणि इतर साहित्य हस्तगत करून 38 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. ज्याची किंमत 2 कोटी 35 लाख इतकी आहे.
या फार्महाऊसवर केअरटेकर म्हणून काम करणारा निखिल लोहार याला पोलिसांनी या प्रकरणात अटक केलीय. तर फार्महाऊसचा मालक असणारा आणि पेशाने वकील असणारा राजकुमार राजहंस सध्या फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईत ज्या महिलेला अटक करण्यात आली. त्याच महिलेच वकीलपत्र मुख्य आरोपी असणाऱ्या वकील राजहंस याने घेतलं होतं. मात्र नंतर त्यानेच ड्रग्सचा धंदा सुरू केला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे डीसीपी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कारवाई करण्यात आलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढोलगरवाडी किंवा आजूबाजूच्या परिसरात या ड्रग्सची सप्लाय चैन अद्याप आढळून आलेली नाही किंवा स्थानिक लोकांशी संबंध आढळून आला नाही. मात्र या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी राजकुमार राजहंस या मुंबईत वकिली करतो. गावी त्याचा फार्महाऊस आहे आणि पोल्ट्री फार्मही आहे. मात्र याच व्यवसायाच्या आड त्याने ड्रग्सचा धंदा सुरू केला होता. मुंबईतुन स्वतःच्याच गाडीतून हे मटेरियल घेऊन तो गावी जायचा आणि तिकडे केअरटेकर असणारा निखिल लोहार ड्रग्स बनवण्याचं काम करायचा. एमडी ड्रग्स तयार झाल्यावर तयार झालेलं ड्रग्स मुंबईत आणून सप्लाय करण्याची जबाबदारी वकील राजकुमार राजहंस याची होती. त्यामुळे येत्या काळात ही साखळी कुठवर जोडली जातेय हे पाहणे महत्वाचे आहे.
इतर बातम्या-