मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका हायप्रोफाईल कुटुंबातील आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. इंटीरियर डेकोरेटर आणि प्लायवूड व्यावसायिक अमित बन्सल यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही स्वतःचा गळा कापला. मेरठ पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्री नगर सेक्टर-1 मध्ये ही घटना घडली आहे. रक्तस्त्राव झालेल्या पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे ती जीवन आणि मृत्यूशी लढत आहे. अमित बन्सल एका हायप्रोफाईल कुटुंबातील आहेत, त्यांचे मेहुणे आयपीएस अधिकारी आहेत. (Meerut high profile family businessman commits suicide, wife cuts throat)
मेरठ पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्री नगर सेक्टर-1 येथे अमित बन्सल एका हायप्रोफाईल कॉलनीमध्ये प्लायवूड आणि इंटीरियर डेकोरेटरचा व्यवसाय चालवतात. अमित बन्सल आपल्या कुटुंबासह शेजारच्या कोठीमध्ये राहतात. अमित यांचा पत्नीसोबच काही कारणावरुन वाद झाला होता, त्यानंतर अमित बन्सल दुपारी त्यांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी गळफास लावून घेतला, अशी प्राथमिक माहिती मिळते.
अमितची पत्नी पिंकी देखील काही वेळानंतर कार्यालयात पोहोचली, तिथे तिने पतीला फासावर लटकलेले पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पिंकीने पेपर कटरने आपला गळा कापला, त्यानंतर ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली. काही वेळानंतर परिसरातील लोकांना याची माहिती मिळाली आणि एकच गोंधळ उडाला. अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.
आतापर्यंत पोलिसांच्या तपासात केवळ आत्महत्येचे पुरावे मिळाले आहेत. मात्र, पोलिसांना या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. असे म्हटले जाते की पती -पत्नीमध्ये वाद झाला असावा, ज्यामुळे अमित बन्सल यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि गळफास लावून आत्महत्या केली. एसपी सिटी विनीत भटनागर यांनी सांगितले की, अमितची पत्नी अजूनही आयसीयूमध्ये आहे. ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेच्या तपासात गुंतले आहेत.
दारुच्या नशेत जावयाने सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये जिल्ह्यातील पीरपेंती ब्लॉकच्या एकचारी दियारा येथे उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलालाही आगीच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मनोज मंडल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी एकेरीच्या ओलनी टोला येथील रहिवासी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मनोज मंडल याला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
आरोपीच्या पत्नी लक्ष्मी हिने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती मद्यपी आहे आणि दारूच्या नशेत अनेकदा घरात मारहाण करत असे. यासंदर्भात वारंवार भांडणे होत असत, याला लक्ष्मीचे आई-वडिल विरोध करीत होते. याच कारणामुळे रागाच्या भरात त्याने ही घटना घडवली. लक्ष्मी सांगते की, तिचा पतीचे परस्त्रीशी संबंध आहेत, ज्याला तिच्या आई आणि वडिलांनी विरोध केला होता. याविषयीही त्याच्या मनात राग होता. तसेच मनोज मंडलची त्याच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर नजर होती. सर्व मुद्द्यांचा तपास केल्यानंतर पोलीस मारेकऱ्याला अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत. (Meerut high profile family businessman commits suicide, wife cuts throat)
संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट, थेट घर पेटवून दिलं, बुलडाण्यात जावयाला बेड्याhttps://t.co/pf91aBpA1A#Crime | #buldana | @buldhanapolice1
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021
इतर बातम्या
पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?
हिंमत म्हणावी की काय? केंद्रीय मंत्र्यांनं चक्क पवारांनाच भेट नाकारली, कारण लखीमपूर?