चार हजार पोलिसांचा बंदोबस्त; थर्टीफर्स्टच्या रात्री 1.78 कोटींच्या सोन्याची लूट; अहमदाबाद हादरले!

| Updated on: Jan 02, 2021 | 6:47 PM

अहमदाबादमध्ये थर्टीफर्स्टच्या रात्री सर्वात मोठी लूट झाल्याचं उघडकीस आलं आहे. (Meghani Nagar Police Caught Gold Robbed From Couriers in Ahmedabad)

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त; थर्टीफर्स्टच्या रात्री 1.78 कोटींच्या सोन्याची लूट; अहमदाबाद हादरले!
गुन्हेगारी वृत्त
Follow us on

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये थर्टीफर्स्टच्या रात्री सर्वात मोठी लूट झाल्याचं उघडकीस आलं आहे. अवघ्या तीन चोरट्यांनी संपूर्ण शहरात 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त असतानाही 1.78 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केली. परंतु, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या चोरट्यांना शिताफिने पकडले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त केलं आहे. (Meghani Nagar Police Caught Gold Robbed From Couriers in Ahmedabad)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघानीनगर एअरफोर्स हेडक्वॉर्टर नजीक तीन अनोळखी व्यक्तीने शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटाने सोन्याने भरलेल्या कुरियरच्या 27 पार्सलची लूट केली. थर्टीफर्स्टमुळे पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल चार हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस कामात व्यस्त असल्याचं पाहून या चोरट्यांनी 1.78 कोटी रुपयांच्या किंमतीच्या सोन्याच्या 27 पार्सलवर डल्ला मारला. विशेष म्हणजे शहरात नाकाबंदी असतानाही पोलिसांची नजर चुकवून हे चोर पसारही झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा नगर येथे राहणारे विद्याधर शर्मा यांच्या जय माताजी लॉजिस्टिक आणि जय माताजी एअर नावाच्या दोन कुरिअर कंपन्या आहेत. जय माताजी एअर कुरिअर कंपनीत सुरेश चौधरी हे त्यांचे भागिदार आहेत. या दोन्ही कुरिअर कंपनीचे कार्यालय राजकोट येथे असून ते अहमदाबाद येथून पार्सल कलेक्ट करत असतात. या दोन्ही कंपन्यांमधून देशातील वेगवेगळ्या भागात विमानाद्वारे सोन्याच्या दागिन्यांचे पार्सल संबंधित दुकानांमध्ये पाठवले जातात.

30 डिसेंबर 2020 रोजी शर्मा यांचे पार्टनर सुरेश चौधरी यांनी विद्याधर शर्मा यांना फोन केला होता. आपला नातेवाईक श्यामसुंदर शर्मा यांच्याकडे राजकोटहून सोन्याचे पार्सल पाठवत असल्याचं चौधरीने शर्मांना सांगितलं. त्यानंतर 31 डिसेंबरच्या रात्री श्यामुसुंदरने शर्मांना फोन करून मी आणि जगदीश विमानतळाजवळच सरदार पटेलांच्या पुतळ्याजवळ तुमची वाट पाहत असल्याचं सांगितलं. त्यानंतर शर्मा हे श्यामसुंदर आणि जगदीशला बाईकवरून घरी घेऊन आले. त्यानंतर शर्मा आणि जगदीश कन्साईन्मेंटसाठी एअर कार्गो कॉम्प्लेक्सकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी तीन अज्ञात इसमांनी येऊन या दोघांना हटकले आणि त्यांच्यावर हल्ला केला.

या तीन अज्ञात इसमांनी जगदीश चौधरी आणि विद्याधर शर्मा यांना जबर मारहाण केली. या हाणामारीत शर्मा यांच्या हाताला आणि जगदीश यांच्या डोक्याला जबर मार लागला. या दोघांना जखमी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे 27 पार्सल असलेली बॅग घेऊन पोबरा केला. मात्र कुरिअर कंपनीने या सोन्याचे दागिने भरलेल्या बॅगेत जीपीएस सिस्टिम बसवली होती. त्यामुळे पोलिसांना या आरोपींचा शोध घेणं सोपं झालं. शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजून 25 मिनिटांनी ही घटना घडली होती. 4 वाजून 10 मिनिटांनी या बॅगेचं लोकेशन गांधीनगरमध्ये दाखवण्यात आलं. त्यामुळे मेघानीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तपास सुरू केला असता त्यांना एक संशयास्पद कार गांधीनगरच्या दिशेने जात असल्याची दिसली. त्यामुळे या कारचा नंबर पोलिसांनी नोंदवून घेतला आणि कारचा पाठलाग करून कारसह आरोपींना ताब्यात घेतलं. अटक केलेल्या पैकी एकजण अन्य एका कुरिअर कंपनीत काम करत होता. त्यामुळे पार्सल कशा पद्धतीने चोरायचं हे त्याला माहीत होतं. या त्याची अधिक चौकशी केली असता अधिक पैसा कमावण्याच्या नादात ही चोरी केल्याचं त्याने मान्य केलं. (Meghani Nagar Police Caught Gold Robbed From Couriers in Ahmedabad)

 

संबंधित बातम्या:

हेड कॉन्स्टेबल महिलेचा मृतदेह 20 दिवस घरातच, आत्मा आला का परत? भयंकर

नात्याला काळिमा! दीड कोटींच्या विम्यासाठी दत्तक मुलाचा बळी; आता खुलेआम फिरतंय जोडपं

सोलापुरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी, 10 दुचाकींसह दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

(Meghani Nagar Police Caught Gold Robbed From Couriers in Ahmedabad)