नाशिकः नाशिकच्या दूध बाजारात भररस्त्यात खून करणाऱ्या संशयित आरोपी आकाश आडेला भद्रकाली पोलिसांनी नांदेडमध्ये जावून बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात दोघात किरकोळ कारणातून वाद झाला आणि एकाने त्याच्याजवळील धारदार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. नितीन उर्फ सोनू गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपी आकाश आडे याला नांदेडमध्ये जावून बेड्या ठोकल्या आहेत. एपीआय मोहिते आणि युवराज पाटील यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.
आनंदवल्ली खून; भूमाफियाला बेड्या
राजकीय दबाव झुगारून पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी अखेर नाशिकमधल्या बहुचर्चित आनंदवल्ली खून प्रकरणाचा सूत्रधार भूमाफिया रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूतला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी रम्मी राजपूतसह बिल्डर बाळासाहेब कोल्हे, सचिन त्र्यंबक मंडिलकसह वीस जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमधल्या आनंदवल्लीमध्ये वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक यांचा खून फेब्रुवारी महिन्यात झाला होता. भूमाफियांनी सुपारी देऊन हे कृत्य केल्याचा संशय होता. या प्रकरणात पोलिसांनी संशयित नितेश सिंग याला ताब्यात झारखंडमधून ताब्यात घेतले होते. एकूण 20 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, मुख्य आरोपी रम्मी राजपूत पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली होती. मात्र, तो सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोल्हापुरात एकाची हत्या, सहा जण जेरबंद
दुसरीकडे, धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्याः
बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष
बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईची चित्त्यासारखी झडप; नाशिकमध्ये हिरकणीचा थरार!
साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!
कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेखhttps://t.co/eINjPiYMLF#Nashik|#Igatpuri|#Corona|#Coronavaccination|#doctorsdeath|#AEFIcommittee
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021