गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 17 वर्षांच्या मुलाचा खून !

| Updated on: Jun 30, 2024 | 10:00 AM

वसईत प्रियकराने त्याच्या प्रेयसीची डोक्यात हॅमर घालून भररस्त्यात सर्वांसमोर निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेला अवघेल काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईत आणखी एक हत्या झाली आहे. ती देखील अवघ्या 17 वर्षाच्या मुलाची. आणि त्याच्या हत्येचं कारण ऐकाल तर तुम्हीही हादराल.

गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 17 वर्षांच्या मुलाचा खून !
Follow us on

राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. खून, चोरी, दरोडे अशा अनेक घटनांमुळे राज्यातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला असून नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागत आहेत. वसईत प्रियकराने त्याच्या प्रेयसीची डोक्यात हॅमर घालून भररस्त्यात सर्वांसमोर निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेला अवघेल काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईत आणखी एक हत्या झाली आहे. ती देखील अवघ्या 17 वर्षाच्या मुलाची. आणि त्याच्या हत्येचं कारण ऐकाल तर तुम्हीही हादराल. गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून अवघ्या 17 वर्षांच्या मुलाला जीवे मारण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू आहे मात्र तरीही सर्रास सर्वच पान टपऱ्यांवर पान मसाल्याच्या स्वरुपात गुटखा मिळत. काळ्या बाजारात वाढीव किंमतीत हे पदार्थ मिळत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मुलुंड पश्चिम येथे खुनाची ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन ताज हुसैन खान असे मृत तरूणाचे नाव असून तो अवघ्या 17 वर्षांचा होता. वसंत गार्डन परिसरातील एका धबधब्याजवळ ही हत्या घडली. पीडित मुलगा त्याच्या 16 वर्षीय मित्रांसह परिसरात गेला तेव्हा तिघांचंया टोळकं त्यांच्याकडे आलं. पीडित तरूणाकडे त्यांनी गुटख्याची मागणी केली. मात्र त्याने तो देण्यास नकार दिल्याने त्या मुलाशी तिघे जण वाद घालू लागले. भांडणादरम्यान, संतापाच्या भरात एका तरूणाने सुरा काढला आणि पीडित तरूणावर सपासप वारल केला. त्याची छाती, हाता-पायांवर वार करून ते तिघेही तेथून फरार झाले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित मुलाला उपचारांसाठी तातडीने अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेणयात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी एकूण ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .