आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा
Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.