नाशिकः खंडणी वसुलीत अग्रेसर असणाऱ्या आणि विविध प्रकारचे 46 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या धनेगर टोळीच्या नाड्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीच्या 17 गुंडांवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आक्रमक होत गुन्हेगारांना वेसण घालण्याचा चंग बांधला आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे, तर नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टोळीचे कारनामे
धनेधर टोळीने गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प भागात व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. तलवार, कोयत्याचा धाक दाखवला जायचा. मुख्य संशियत सिद्द्ध्या उर्फ सिद्धांत सचिन धनेधर याने ही टोळी तयार केल्याचे समजते. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आक्रमक होत, या टोळीतल्या गुंडांची धरपकड सुरू केल्याचे समजते. दोन महिन्यांवर नाशिक महापालिका निवडणूक आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आले असल्याची चर्चा आहे.
सिद्ध्या होता तडीपार
धनेधर टोळीचा प्रमखु सिद्ध्या धनेधर याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, पोलिसांची दिशाभूल करून तो गुन्हेगारी कारवाया करायचा. या वर्षीही त्याने दुकानात बळजबरीने घुसून रोख रक्कम लुटल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी 4 सप्टेंबर रोजी फिर्यादीने तक्रार दिली होती. उपनगर, जेलरोड, नाशिकरोड या भागात धनेधर टोळीची दहशत आहे. व्यावसायिकांकडून खंडणी वसुली करणे, शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी, मारहाण करणे, लुटणे असे तब्बल 46 स्वरूपाचे गंभीर गुन्हे या टोळीतील संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
सुटकेचा निश्वास
पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी आक्रमक होत धनेधर टोळीच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यांच्यावर मोक्काची कारवाई केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण या टोळीविरोधात तक्रार केली की, पुन्हा संबंधितांचा त्रास वाढायचा. त्यांना पुन्हा धमकावण्याचे, खंडणी वसूल केल्याचे प्रकार व्हायचे. या त्रासापासून आता नाशिकच्या नागरिकांची सुटका झाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारावरील कडक कारवाई अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी सामान्य नाशिककर करत आहेत.
Mantra Chanting | संकटांपासून लांब राहायचंय, तर या 12 नामांचा रोज जप करा, संकटमोचन मदतीला धावून येतीलhttps://t.co/1N6pgeRV7x #LordHanuman| #LordHanumanPuja | #mantrachanting
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2021
इतर बातम्याः