वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लसीच्या तंत्रज्ञानावरून लस उत्पादक कंपन्यांमध्ये न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे. अमेरिकेतील फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्नाने फायझर (Pfizer) आणि बायोटेक (Biotech) या लस उत्पादक कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. फायझर आणि बायोटेक या कंपन्यांनी कोविड-19 ची लस विकसित करताना पेटंट (Patent)चे उल्लंघन केल्याचा आरोप मॉडर्नाने केला आहे. कंपनीने शुक्रवारी यासंदर्भात एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, मॅसॅच्युसेट्समधील यूएस जिल्हा न्यायालयात आणि जर्मनीतील डसेलडॉर्फ येथील प्रादेशिक न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या कोविड-19 लस समुदायाने मॉडर्नाच्या मूलभूत mRNA तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या 2010 आणि 2016 दरम्यान दाखल केलेल्या पेटंटचे उल्लंघन केले आहे, असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे.
लस उत्पादक मॉडर्ना कंपनीने अमेरिका आणि जर्मनीच्या कोर्टात Pfizer-Biontech या कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. Pfizer-Biontech ने कोरोनाविरुद्ध बनवलेली m-RNA लस मॉडर्नाच्या तंत्रज्ञानाची नक्कल करून बनवली आहे, असा दावा मॉडर्नाने केला आहे. मॉडर्नाच्या मते, m-RNA लस तयार करण्याचे तंत्रज्ञान 2010 ते 2016 दरम्यान पेटंट करण्यात आले होते. त्याच्याद्वारेच फायझर-बायोटेकने मॉडर्नाच्या परवानगीशिवाय कॉमिर्नाटी ही लस तयार केली. मॉडर्नाने म्हटले आहे की, त्यांची कोरोनाविरुद्धची लस स्पाइकवॅक्स या तंत्रज्ञानातून बनवली आहे, असे मॉडर्नाने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. कोरोना महामारीच्या दहा वर्षांपूर्वीच मॉडर्नाने अब्जावधी डॉलर्स खर्च करून या तंत्रज्ञानाचा शोध लावला होता आणि त्याचे पेटंट घेतले होते. पण कोरोना महामारीच्या काळात Pfizer-Biotech ने आपले तंत्रज्ञान चोरून स्वतःची लस बनवली, असा मॉडर्ना कंपनीचा दावा आहे. फायझर-बायोनटेकची लस कॉमिर्नाटी बाजारातून काढून टाकली जावी किंवा भविष्यात तिच्या निर्मिती किंवा विक्रीवर बंदी घालावी, अशी आपली इच्छा नाही, असेही मॉडर्नाने स्पष्ट केले आहे.
मॉडर्नाच्या मते, Pfizer-Biotech ने मॉडर्नाने पेटंट केलेल्या तंत्रज्ञानातून लस तयार करण्याच्या दोन पद्धती चोरल्या आहेत. मॉडर्नाने 2010 मध्ये एम-आरएनए लसीच्या निर्मितीमध्ये ज्या रसायनांचा शोध लावला होता, (जेणेकरून शरीराला एम-आरएनए लसीनंतर अनावश्यक रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळू नये) त्याच रसायनांचा वापर फायझर-बायोनटेकने केला होता. MODERNA ने आधीच m-RNA लसीमध्ये या रसायनांच्या वापराचे पेटंट घेतले होते, असे मॉडर्नाने अमेरिका आणि जर्मनीच्या न्यायालयांत दाखल केलेल्या दाव्यामध्ये म्हटले आहे. (Moderna files case against Pfizer and biotech over vaccine technology)