टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची ED कडून तब्बल 9 तास चौकशी

| Updated on: Oct 09, 2024 | 1:51 PM

रात्री 9 वाजता तो ईडी कार्यालयातून निघाला. HCA मधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे. ईडीने या संबंधी मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये छापेमारी केली होती.

टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची ED कडून तब्बल 9 तास चौकशी
Cricket_Pitch
Follow us on

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि काँग्रेस नेता मोहम्मद अजहरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोशिएशनमधील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात मंगळवारी ईडीसमोर हजर झाला. नऊ तासापेक्षा पण जास्तवेळ त्याची चौकशी झाली. मोहम्मद अजहरुद्दीन 61 वर्षांचा आहे. 3 ऑक्टोंबरला त्याला ईडी समोर हजर व्हायला सांगितलं होतं. माजी खासदार असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीनने वेळ मागून घेतला. त्यानंतर त्याला 8 ऑक्टोंबरला बोलवण्यात आलं.

सफेद सदरा-लेंगा परिधान करुन आलेला मोहम्मद अजहरुद्दीन सकाळी 11 वाजता फतेह मैदान रोड येथील ईडी कार्यालयात आला. त्याच्यासोबत त्याची कायदेशीर टीम सुद्धा होती. रात्री 9 वाजता तो ईडी कार्यालयातून निघाला. HCA मधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे. ईडीने या संबंधी मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये छापेमारी केली होती.

अजहरुद्दीन काय म्हणाला?

‘चौकशीत मी सहकार्य करतोय’ असं मोहम्मद अजहरुद्दीन बाहेर येताना पत्रकारांना सांगितलं. जे आरोप करण्यात आलेत, ते निराधार आणि चुकीचे आहेत. त्याशिवाय मला जास्त काही बोलायचं नाहीय. HCA अध्यक्ष म्हणून अजहरुद्दीन यांच्या कार्यकाळातील त्यांची भूमिका चौकशीच्या फेऱ्यात आहे. मागच्यावर्षी तेलंगण विधानसभा निवडणुकीत अजहरुद्दीनचा पराभव झालेला. मागच्यावर्षी तेलंगण पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर अजहरुद्दीनने सांगितलं की, ‘त्याच्याविरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. प्रतिमा खराब करण्याचा हेतू यामागे आहे’