महाराष्ट्रातील 4 मोठ्या शहरांमध्ये ईडीने आज छापेमारी केली आहे. ईडीकडून बीड, पुणे, औरंगाबाद आणि नवी मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून 1 कोटी 2 लाख रुपयांची बँकेतील मालमत्ता गोठविण्यात आली आहे. ईडीने सुरेश कटे ग्रुपशी संबंधित मनी लॉन्ड्रीत प्रकरणात ही कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे देखील लागली आहेत. ईडीने सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीची ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे.
ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सुरेश कुटे ग्रुप आणि इतरांच्या विरोधात दाखल तक्रारींनुसार, बीड, पुणे, औरंगाबाद आणि नवी मुंबईत येथे जावून छापेमारी केली. या छापेमारीत ईडीच्या हाती बँक खात्यातील पैसे आणि डिमॅट खात्यातील शेअर्स असे 1 कोटी 2 लाख रुपयांची मालमत्ता सापडली. ईडीने ही सर्व मालमत्ता तातडीने जप्त केली. तसेच विविध प्रकारचे कागदपत्रे आणि डिजीटल उपकरे देखील जप्त करण्यात आले.
ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुप यांच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संस्थांकडून राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. ईडीकडून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांकडून भारतीय दंड संहिता, १८६० आणि बहुविवाह प्रतिबंधक कायदा, १९९९ अंतर्गत नोंदवलेल्या विविध गुन्हे दाखल खटल्यांच्या आधारे सुरेश कुटे आणि इतर यांनी एम/एस. ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (डीएमसीएसएल) च्या माध्यमात गुंतदारांशी केलेल्या फसवणुकीबाबत तपास सुरू करण्यात आला.
आजवर नोंदवलेल्या आणि एफआयआरनुसार, गुंतवणूकदारांची अंदाजे १६८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. डीएमसीएसएलचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश कुटे, यशवंत व्ही कुलकर्णी आणि इतर यांच्या हातात होते. त्यांनी विविध ठेवी योजना आणल्या आणि त्यांना १२ ते १४ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले. या संस्थेने व्यक्तिगत कर्ज, साधे कर्ज, वेतन कर्ज, मुदत कर्ज, सोने कर्ज आणि एफडीआर कर्ज इत्यादी विविध योजना देखील सुरू केल्या.
ईडीच्या तपासात असे दिसून आले की सुरेश कुटे आणि संबंधितांनी जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन भोळ्या गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलमध्ये पैसे जमा करण्यासाठी लालच दिला. पण ठेवींची मुदत संपल्यावर गुंतवणूकदारांना कोणतेही किंवा केवळ आंशिक पैसे देण्यात आले नाहीत, ज्यामुळे त्यांची फसवणूक झाली आणि त्यांचे पैसे संस्थेच्या व्यवस्थापनाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या तपासात असे दिसून आले की, ठेवीदारांकडून जमा केलेले डीएमसीएसएलचे पैसे सुरेश कुटे आणि इतर संबंधितांनी स्वतःच्या फायद्यासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरले. ईडीच्या पुढील तपासात असेही दिसून आले की, डीएमसीएसएलचे निधी विविध फेक कंपन्यांच्या माध्यमात स्तरबद्ध करून वळवले गेले आणि हे निधी ‘कुटे ग्रुप’च्या कंपन्यांमध्ये शेअर भांडवल/गुंतवणूक म्हणून दाखल करण्यात आले. तसेच, तपासात असेही दिसून आले की डीएमसीएसएलचे निधी फेक/खोट्या कंपन्यांचे जाळे तयार करून स्तरबद्ध करून हॉंगकांगला वळवले गेले. डीएमसीएसएलच्या गुंतदारांची फसवणूक करून मिळालेले उत्पन्न सुरेश कुटे आणि संबंधितांनी विविध संपत्ती खरेदी करण्यासह स्वतःच्या फायद्यासाठी वापरले गेले. त्या संबंधित पुरावे देखील जप्त करण्यात आले आहेत. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.