पूजा खेडकर नंतर आता आणखी एक IPS चर्चेत, नवऱ्याच्या नको त्या कृत्यांनी आणलं अडचणीत

| Updated on: Jul 18, 2024 | 11:54 AM

आता आणखी एक महिला IPS चर्चेत आहेत. आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्या चर्चेत आहेत. पुरूषोत्तम चव्हाणला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

पूजा खेडकर नंतर आता आणखी एक IPS चर्चेत, नवऱ्याच्या नको त्या कृत्यांनी आणलं अडचणीत
pooja khedkar-Abhishek singh
Follow us on

IAS पूजा खेडकर माजी IAS अभिषेक सिंह यांच्यानंतर आता आणखी एक महिला IPS  चर्चेत आहेत. आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्या चर्चेत आहेत.  या IPS चे पती पुरूषोत्तम चव्हाण यांना टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात अटक झालीय. त्यांच्याबद्दल नव नवीन खुलासे होत आहेत. ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान व्यावसायिक राजेश बटरेजाकडून कथित पैसे आणि कागदपत्रांनी भरलेली बॅग आणण्यासाठी पुरूषोत्तम चव्हाण यांनी IPS पत्नीसाठी तैनात दोन कॉन्स्टेबल्सना पाठवलं होतं. पुरुषोत्तम चव्हाणला टप्याटप्याने 10.40 कोटी रुपये दिल्याच बटरेजाने मान्य केलं.

प्रवर्तन निर्देशालयने अलीकडेच 263 कोटी रुपयांच्या आयकर टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात पूरक आरोपपत्र दाखल केलय. चव्हाण, बटरेजा, कर सल्लागार अनिरुद्ध गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. त्याशिवाय मेसर्स एजी इंटरप्रायजेज, मेसर्स यूनिवर्सल मार्केटिंग एंड एडवायजरी सर्विसेज एलएलपी (यूएमएएस) आणि ड्वालॅक्स एंटरप्रायजेज प्रायवेट लिमिटेड विरुद्ध तक्रार दाखल केलीय.

कोर्टाने काय म्हटलं?

विशेष पीएमएलए न्यायाधीश एसी डागा यांनी ईडीच्या तक्रारीची दखल घेतली. आरोपी व्यक्तीचा गुन्ह्यामध्ये थेट सहभाग होता. अन्य आरोपींना हवाला चॅनलच्या माध्यमातून भारतातून दुबई आणि दुबईहून भारतात पैसे ट्रान्सफर करायला मदत केली.

दुबईत कोणाकडे पैसा ठेवला?

माजी आयकर अधिकारी तानाजी मंडल यांनी कथितपणे 263 कोटी रुपयांचा बनावट टीडीएस रिफंड बनवलेला. तानाजी आयटी मुंबईच्या कार्यालयात तैनात होते. या प्रकरणात ईडीच्या चौकशीत पुरूषोत्तम चव्हाण आणि बटरेजा यांची नाव समोर आली. अधिकाऱ्याने जो पैसा मिळाला तो दुबईला पाठवून दिला. शेख मोहम्मद इब्राहिम अब्दुलअजीज अलमुल्ला जवळ हा पैसा ठेवण्यात आला होता, असा आरोप आहे.

पुरूषोत्तम चव्हाणला अटक कधी झाली?

एजेंसीने बटरेजाची जबानी सुद्धा नोंदवली. ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान अनेक टप्प्यात चव्हाणला 10.40 कोटी रुपये रक्कम देण्यात आली. पुरूषोत्तम चव्हाणला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.