गुरुग्राम : हरियाणातील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये उच्चशिक्षित मायलेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघी जणी गुरुग्राम शहरातील वर्धमान मंत्रा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाड्याने राहत होत्या. अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडिलांनी हॉटेलमध्ये विष पिऊन जीव दिला होता. त्यानंतर मायलेकींनीही आयुष्य संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
46 वर्षीय वीणा शेट्टी आणि 24 वर्षीय यशिका शेट्टी अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावं आहेत. 6 जुलै रोजी गुरुग्रामच्या सेक्टर 53 मधील एका हॉटेलमध्ये वीणा शेट्टी यांचे पती हरी शेट्टी यांनीही विष पिऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे मायलेकींनीही विष प्राशन करुनच आयुष्याची अखेर केली.
कर सल्लागार पिता, एमबीए विद्यार्थिनी लेक
हरी शेट्टी हे कर सल्लागार म्हणून कार्यरत होते, तर वीणा एका खासगी कंपनीत सेल्स विभागात काम करत होत्या. तर यशिका एमबीएचे शिक्षण घेत होती. जानेवरी 2021 मध्येच शेट्टी कुटुंब गुरुग्राम शहरातील वर्धमान मंत्रा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाड्यावर घर घेऊन राहायला आले होते.
आई बाथरुममध्ये, मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत
मायलेकीच्या आत्महत्येचं वृत्त समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा वीणा बाथरुममध्ये, तर यशिका बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
हरी शेट्टी आपल्या कुटुंबासोबत राहत नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. वीणा यांना जुळ्या मुली असल्याची माहिती आहे. यशिका एमबीएचे शिक्षण घेत होती, तर दुसरी मुलगी कायद्याचं. एकामागोमाग एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली, हे कोडं पोलिसांना उलगडलेलं नाही. गुरुग्राम सेक्टर 65 पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
संबंधित बातम्या
अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून
मुंबईत चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, 28 वर्षीय आरोपीला बेड्या
(Mother Daughter Consume Poison days after Husband’s Suicide at Gurgaon Hotel)