मुंबई पोलिसांकडून ई-सिगारेटवर कारवाई सुरुच, जुहू-तारा रोडवर दुकानावर छापा

| Updated on: Feb 21, 2023 | 4:30 PM

सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी प्रतिबंधीत ई-सिगारेट आणि परदेशी बनावटीच्या सिगारेटचा साठी वितरण आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई सुरु केली.

मुंबई पोलिसांकडून ई-सिगारेटवर कारवाई सुरुच, जुहू-तारा रोडवर दुकानावर छापा
मुंबई गुन्हे शाखेकडून जुहूतील दुकानात छापेमारी करत ई-सिगारेट जप्त
Image Credit source: Social
Follow us on

मुंबई / कृष्णा सोनारवाडकर (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांनी ई-सिगरेट विरोधात कारवाईचा बडगा उचलला असून, गेल्या काही दिवसांपासून लाखो रुपयांच्या ई सिगारेट जप्त केल्या आहेत. सोमवारी रात्री मुंबईच्या जुहू बिच जवळून तब्बल 30 लाख रुपयांच्या ई-सिगरेट जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी शाखेने जुहू तारा रोडवरील “शेडी ग्रोवे बिडी शॉप” वर छापा टाकला. छाप्यात 30 लाख 6 हजार रुपये किमतीच्या ई-सिगरेट तसेच परदेशी बनावटीच्या सिगरेट आणि फ्लेवरचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इरफान मोईद्दिन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे दुकानावर छापा

सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी प्रतिबंधीत ई-सिगारेट आणि परदेशी बनावटीच्या सिगारेटचा साठी वितरण आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई सुरु केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जुहू तारा रोडवरील “शेडी ग्रोवे बिडी शॉप” या दुकानावर छापा टाकला.

एकूण 30 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

या छापेमारीत सदर दुकानातून 30 लाख 6 हजार रुपयांच्या ई-सिगारेट, 68 हजार 400 रुपयांच्या वैधानिक इशारा नसलेल्या परदेशी सिगारेट असा एकूण 30 लाख 74 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आणि 2 हजार 400 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात कलम 7, 8 प्रोहिबेशन ऑफ ई-सिगारेट अधिनियम 2019 सह कलम 7(2), (3) आणि 20 सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त गुन्हे लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक मनोज सुतार, पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, सहाय्यक फौजदार जंगम, पोलीस शिपाई पाटसुपे, पोलीस शिपाई घाडी, पोलीस शिपाई लोहार यांनी ही कारवाई केली.