मुंबई : टूरिस्ट व्हिसा घेऊन मुंबईत येत वेब सिरिजचे शूटिंग करणाऱ्या 17 परदेशी कलाकारांविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व कलाकारांवर व्हिसा नियम उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात 10 महिला आणि 7 पुरुषांसह 17 परदेशी अभिनेते आणि अभिनेत्रींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे लोक परदेशातून टुरिस्ट व्हिसा घेऊन मुंबईत आले होते आणि दहिसरमध्ये वेब सिरीजचे शूटिंग करत होते. याबाबत दहिसर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल तात्काळ शूटिंग बंद केले.
शूटिंग थांबवून सर्व परदेशी कलाकारांची तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या कलाकारांकडे शूटिंगसाठी परवानगी आहे. मात्र भारतात शूटिंगसाठी आले असतानाही त्यांनी टूरिस्ट व्हिसा घेत नियमाचे उल्लंघन केले.
यापैकी काही डान्सर आहेत, काही बॅक स्टेज परफॉर्मर्स आहेत. हे सर्व लोक डेली वेजेस वर काम करणारे कलाकार आहेत. त्यापैकी काही रशियाचे आहेत तर काही यूकेसह विविध देशांतील आहेत.
सध्या पोलिसांनी गुन्हा कलम 14 (बी) द फॉरेनर्स अॅक्ट 1946 चे अन्वये गुन्हा दाखल करून सर्वांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्यसनाची पूर्तता करण्यासाठी चोरी केल्याप्रकरणी ‘झुंड’ चित्रपटातील कलाकाराला नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. बाबू छत्री असे या कलाकाराचे नाव आहे. एका घरफोडीच्या आरोपाखाली मानकापूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये बाबू छत्रीचाही समावेश होता.