Rana Couple Detained : राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी ताब्यात घेतले

| Updated on: Apr 23, 2022 | 6:08 PM

भाजपच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणते कलम लावण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले.

Rana Couple Detained : राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी ताब्यात घेतले
राणा दाम्पत्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यावर खार पोलिस (Khar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा (Rana) दाम्पत्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस राणा यांच्या घरी दाखल झाले. मात्र वॉरंट आणल्याशिवाय आपण पोलिस ठाण्यात येणार नाही अशी भूमिका राणा दाम्पत्याने घेतली. मात्र अखेर कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा दाम्पत्याला पोलिसांच्या गाडीतून खार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दोन दिवस आम्ही घराबाहेर पडलो नाही तरी आमच्यावर गुन्हा दाखल केला. आमच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर मात्र गुन्हा दाखल होत नाही. मग आमच्यावर कसा होतो, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. तर संजय राऊत, अनिल परबांविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे असे रवी राणा म्हणाले. याचदरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन एकूण परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे समजते. (A case was registered against the Rana couple at Khar police station and police took them into custody)

हनुमान चालिसा पठणवरुन वाद

भाजपच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणते कलम लावण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले. याचदरम्यान शिवसैनिकांनीही आक्रमक भूमिका घेतली. खासदार नवनीत राणा व त्यांच्या पतीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी लावून धरली. त्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.

शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणा दाम्पत्य नरमले

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले होते. मात्र शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राणा दाम्पत्याने नरमाई घेतल्याचे दिसत आहे. राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईला येणार आहेत, त्याचे कारण देत आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. याचदरम्यान पोलिसांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानी धाव घेतली आणि या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात नेले आहे.  (A case was registered against the Rana couple at Khar police station and police took them into custody)

इतर बातम्या

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Navneet Rana Video: शेवटी मुंबई पोलीसांनी हिसका दाखवला, भरड्राम्यातून नवनीत राणांना उचललं, गाडीत डांबलं, नेमकं काय घडलं?