मुंबई : काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरमान कोहलीला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या न्यायालयाने अरमान कोहलीला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. अरमानच्या घरावर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता आणि यावेळी अभिनेत्याच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. यानंतर त्याला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. अरमानला कलम 21(a), 27(a), 28, 29, 30 आणि 35 अंतर्गत अटक करण्यात आली. (Actor Arman Kohli has been remanded in judicial custody for 14 days in a drug case)
अरमान व्यतिरिक्त ड्रग पेडलर अजय सिंहलाही अटक करण्यात आली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सिंग हे हिस्ट्री चीटर आहेत आणि कोहलीचे नाव चौकशी दरम्यानच समोर आले. अहवालांनुसार, कोहली आणि सिंग व्यतिरिक्त, एनसीबीने ड्रग्स प्रकरणात आणखी 4 लोकांना अटक केली आहे, ज्यात 2 नायजेरियन नागरिक होते. सध्या एनसीबी बाकीच्यांचीही चौकशी करत आहे.
NCBनं अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असतं त्यामुळे हे अरमानकडे आलं कसं याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे, हे ड्रग्स कसं आणलं जातं हे शोधण्यावर आता एनसीबीचा भर असणार आहे.
मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती NCB ला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने शनिवारी अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले.
अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.
विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता. जानी दुश्मन या चित्रपटातही त्याने काम केलेले आहे. (Actor Arman Kohli has been remanded in judicial custody for 14 days in a drug case)
Intimate Scene : आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटातून इंटीमेट सीन वगळला, जाणून घ्या कारणhttps://t.co/XlnkDYIe8C#GangubaiKathiawadi |#IntimateScene |#AliaBhatt |#SanjayLeelaBhansali
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2021
इतर बातम्या
Bank Job 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO पदासाठी भरती, अर्ज कसा कराल?
नवे वैज्ञानिक घडवण्यास राज्य सरकारचा पुढाकार, विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यास मान्यता; ठिकाणही ठरलं