मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर (Palghar) जिल्ह्यातील वसई इथं राहणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder case) या तरुणीची राजधानी दिल्लीत हत्या झाली. 6 महिन्यांपूर्वी हे हत्याकांड घडलं. श्रद्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. घर सोडून आफताब पुनावालासोबत ती मुंबई सोडून दिल्लीत गेली. आफताब पुनावाल यानेच श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, असं पोलिसांनी म्हटलंय. त्यानंतर तिच्या शरीराचे त्याने 35 तुकडे केल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी सखोल चौकशी केली जातेय. आरोपी आफताब पुनावाला याला अटक करण्यात आलीय. पुढील तपास केला जातोय. ही घटना ताजी असतानाच आता दिल्लीसारखीच संपातजनक घटना मुंबईत (Mumbai Crime News) घडल्याचं समोर आलंय. दहिसर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला पाण्याच्या टाकीवरुन ढकलून दिलं. त्यानंतर ती तब्बल 18 फूट खाली कोसळली. या प्रकारात तरुणीला गंभीर दुखापत झालीय.
गंभीर जखणी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तिचा जीव थोडक्यात वाचलाय. पण ती जायबंदी झालीय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने तिला ढकललं, त्याच्यासोबत ती लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
समोर आलेलीय माहितीनुसार श्रद्धा वालकर प्रमाणेच ही तरुणीदेखील कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याचं माहिती समोर आलीय. तरुणी आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरमध्ये काही कारणावरुन भांडण झालं होतं. या भांडणाच्या रागातून तरुणाने तिला खाली ढकलून दिलं होतं.
सध्या याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एफआयआर नोंदवलाय. तसंच आरोपी मुलाला अटक देखील केलीय. सध्या याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.