अंबरनाथमधील साक्षीदाराला जीवघेण्या मारहाणीचं प्रकरण, फरार आरोपींकडून आमदार बालाजी किणीकरांना श्रीकृष्णाची उपमा

| Updated on: Sep 05, 2024 | 6:04 PM

अंबरनाथमधील साक्षीदाराला जीवघेण्या मारहाणीचं प्रकरणावरुन आता वेगळी चर्चा सुरु झालीय. फरार आरोपींनी फेसबुक स्टेटसवर आमदार बालाजी किणीकर यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच आरोपींनी बालाजी किणीकर यांना श्रीकृष्णाची उपमा दिली आहे.

अंबरनाथमधील साक्षीदाराला जीवघेण्या मारहाणीचं प्रकरण, फरार आरोपींकडून आमदार बालाजी किणीकरांना श्रीकृष्णाची उपमा
अंबरनाथमधील साक्षीदाराला जीवघेण्या मारहाणीचं प्रकरण, फरार आरोपींकडून आमदार बालाजी किणीकरांना श्रीकृष्णाची उपमा
Follow us on

अंबरनाथमध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील साक्षीदाराला आरोपींनी जीवघेणी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपींनी अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा व्हिडिओ वापरून फेसबुकवर स्टेटस ठेवत त्यांना श्रीकृष्णाची उपमा दिली आहे. त्यामुळे आमदार बालाजी किणीकर यांचं आरोपींना पाठबळ आहे का? असा अशी चर्चा अंबरनाथ शहरात सुरू झाली आहे.

अंबरनाथमध्ये राहणारे विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत. या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुक्कु हे मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणाची 20 ऑगस्टला कोर्टात सुनावणी होती. या तारखेला विनायक यांनी जाऊ नये, यासाठी लेनिन मुक्कु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कट रचून विनायक पिल्ले यांचं अपहरण करत त्यांना जीवघेणी मारहाण केली.

साक्षीदाराला विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेलं आणि…

आरोपींनी विनायक पिल्ले यांना अंबरनाथ चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेलं. तिथे विकास सोमेश्वर आणि लेनिन मुक्कु यांच्यासह काही जणांनी 15 ते 20 मिनिटे मला मारहाण केली, असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला होता. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुक्कु आणि पदाधिकारी विकास सोमेश्वर, गुड्डू रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.

या फरार आरोपींपैकी विकास सोमेश्वर याने बुधवारी फेसबुक स्टेटसवर एक व्हिडिओ ठेवला. त्यात आमदार बालाजी किणीकर हेही दिसत आहेत. तसेच आमदार बालाजी किणीकर यांना या व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार बालाजी किणीकर यांचं आरोपींना पाठबळ आहे का? अशी चर्चा यानंतर अंबरनाथ शहरात सुरू झाली आहे. या सगळ्या बाबत शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.