मुंबई : मार्च महिन्यात जुहू परिसरातून उघडकीस आणलेल्या ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यात जुहू परिसरात एटीएसने कारवाई करत 2 कोटी 53 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले होते. या गुन्ह्यात आरोपी सोहेल युसूफ मेमन याला अटक करण्यात आली होती. तर निरंजन जयंतीलाल शाह याला वॉन्टेड घोषित करण्यात आलं होतं.
आता ओरोपी निरंजन शाह याला दिल्लीत अटक करण्यात आली. शाह हा बहुचर्चित शेअर घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहताचा सहकारी होता. त्याच्यावर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना गुंगारा देत तो अनेक दिवस फिरत होता. अखेर दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहू युनिटने त्याला दिल्लीत बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 25 ऑगसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची ड्रग्स विरोधात काम करणारी अँटी नार्कोटिक्स सेल म्हणजे अंमली पदार्थ विरोधीपथकाने ड्रग्स माफिया विरोधात मोहीमच सुरु ठेवली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलमार्फत या वर्षाच्या सुरुवाती पसून आतापर्यंत एकूण 10 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 कोटी 38 लाख किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 1335 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि 1614 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे परदेशी नागरीक सुरुवातीला काहीतरी कारण देऊन जसं की नोकरी, उपचारचा आधार घेऊन मुंबईत येतात. नंतर ते इथेच स्थायीक होऊन ड्रग्स व्यवसायात गुंततात. या सर्वांनी आपापला एरिया देखील वाटून घेतला आहे. ते दुसऱ्याच्या एरियामध्ये हस्तक्षेप शक्य तो करीत नाही.
नायजेरियन आरोपी तर एवढे हिंसक होतात कि अनेक वेळा तपासादरम्यान त्यांनी तपास करणाऱ्या पोलिसांवर हल्ला किंवा फायरिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळ कोणतेही कागदपत्रे मिळत नाहीत किंवा कोणताच पुरावा मिळत नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवून ते ज्या देशातून आले आहेत त्या देशात पाठविणे हे आपल्या तपास यंत्रणेसमोर एक मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
हेही वाचा :
तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण