मुंबई : मुंबईकरांनो, तुम्ही जर रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगमध्ये बाईक पार्क करुन चावी तर पार्किंग वाल्याकडे ठेवून जात असाल, तर सावधान! पश्चिम उपनगरातील बोरिवली रेल्वे स्थानकात बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. पार्किंग वाल्याकडे ठेवण्यात आलेल्या बाईकच्या चाव्या चोरी बाईक पळवणाऱ्या अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बोरिवली जीआरपी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात बाईक पार्क करण्यांनी आता विशेष सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कृष्ण राम भूषण पांडे असं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण राम भूषण पांडे या आरोपीचं वय 28 वर्ष आहे. तो पार्किंगमध्ये लावलेल्या बाईक चोरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघड झालं होतं.
अखेर पोलिसांनी या बाईक चोराला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय चोरीच्या दुचाकीही जप्त केल्यात. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
#Mumbai : बोरिवली रेल्वे स्थानक पश्चिम येथील पार्किंगमधून दुचाकी चोरुन नेणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अखेर अटक, बोरीवली जीआरपीकडून आरोपीची कसून चौकशी सुरु, रेल्वे स्थानकात पार्किंग करणंही सुरक्षित नाही… #Watch #CCTV pic.twitter.com/S1R20fAJVs
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 13, 2022
ज्या वाहनाची चावी रेल्वे स्थानकातील पार्किंगमध्ये ठेवली जात होती, ती आरोपी अतिशय सहजपणे चोरायचा, अशी माहिती बोरिवली जीआरी येथील पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली. बोरिवली पश्चिमेकडील पार्किंगमधून एका महिलेचा एक्टीव्हा चोरीला गेल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला असता आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पेटवून जीआरपी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या पांडे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याने अशाप्रकारे इतरही बाईक चोरी केल्या असण्याची शंका व्यक्त केली जाते आहे. सध्या त्याची कसून चौकशी पोलिसांकडून सुरु असून पुढील तपास केला जातोय.