स्वस्त धान्याचा काळा बाजार; मुंबईत गोदामावर छापा, 25 लाखांचा धान्यसाठा जप्त

| Updated on: Dec 18, 2021 | 6:44 AM

मुंबईच्या गोरेगाव परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वस्त धान्य विभागाच्या मदतीने अरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर छापा टाकला आहे.

स्वस्त धान्याचा काळा बाजार; मुंबईत गोदामावर छापा, 25 लाखांचा धान्यसाठा जप्त
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वस्त धान्य विभागाच्या मदतीने अरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये काळ्या बाजारात जाणारे 25 लाख रुपयांचे स्वस्त धान्य जप्त करण्यात आले आहे.

स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने कारवाई

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोरेगाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे मुंबईच्या विविध भागांमध्ये अधिक दराने विकले जात होते. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा अरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने छापा टाकला.  या छाप्याममध्ये पाच ट्रकसह  तब्बल 25 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हा सर्व साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वीस जणांना घेतले ताब्यात

दरम्यान या कारवाईमध्ये पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून 25 लाख रुपयांचा स्वस्त धान्याचा साठा, पाच ट्रक आणि वीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा स्वस्त धान्याचा साठा नेमका कुठे -कुठे विक्रीला जाणार होता, याची आता आरोपींकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या 

Hariyana : मालिकेत काम मिळवून देतो सांगत आधी मैत्री केली, नंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Osmanabad Crime: उस्मानाबादमध्ये क्राईम पेट्रोल पाहून चिमुरड्याची हत्या; नेमकी का केली हत्या? वाचा सविस्तर

Fake Loan Apps : काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स