मुंबई : बसचे ब्रेक फेल (Break Fail) झाल्याने बसने दिलेल्या धडकेत चार जण जखमी (Injured) झाल्याची घटना मंगळवारी दुपारी गोरेगाव परिसरात घडली आहे. सदर बेस्ट बस संतोष नगरहून कुर्ल्याकडे जात असतानाच दुपारी हा अपघात घडला. अपघाताताची ही चित्तथरारक दृश्यं सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास कीत आहेत. बसमधील चालक आणि वाहक यांनाही दुखापत झाली आहे. जखमींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालय आणि दिंडोशीतील वेदांत या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai: Four people were injured after a bus hit them. The accident took place due to brake failure of the bus which was going from Santosh Nagar to Kurla. Dindoshi police has registered a case and started further investigation.
हे सुद्धा वाचा(CCTV Visuals) pic.twitter.com/OKMMUpqPrO
— ANI (@ANI) August 9, 2022
दिंडोशीहून कुर्ल्याला बस क्र. 326 नियमित वेळेप्रमाणे मंगळवारी दुपारी मार्गस्थ झाली. मात्र दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक बसचे ब्रेक झाले आणि बस अनियंत्रित झाली. संतोषनगरमधील बीएमसी कॉलनीजवळ एका रिक्षाला धडक देत अनियंत्रित बस पुढे मंदिरावर धडकली. यात बसमधील चालक, वाहक यांच्यसह चार जण जखमी झाले आहेत. यात रिक्षाचाही चक्काचूर झाला आहे. आबासाहेब पांडुरंग कोरे (54, बस वाहक), कुंडलिक किसन धोंगडे (43, बस चालक), होवाळ सरकू पांडे (45, रिक्षा चालक), गोविंद प्रसाद पाठक (80) आणि रजनिश कुमार पाठक (37) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी तिघांना बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालयात तर दोघांना दिंडोशीतील वेदांत खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.