Salman Khan Conspiracy to kill: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संबंधित लोकांची धरपकड सुरु आहे. देशभरात लॉरेन्स बिश्नोई गँगचे असलेले नेटवर्क उद्धवस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. पोलिसांनी बिश्नाई गँगचा शूटर सुक्खा याला अटक केली आहे. या अटकेनंतर सुक्खा याने धक्कादायक माहिती दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट बिश्नोई गँगने आखला होता. त्यासाठी शूटरने सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्री केल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले. परंतु त्यांचा हा प्लॅन फेल झाला.
हरियाणामधील पानीपत येथून मुंबई पोलिसांनी सुक्खा याला अटक केली. सुक्खाने 2022 मध्ये मुंबईतील सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाउसमध्ये रेकी केली होती. तोच सलमान खान याच्यावर हल्ला करणार होता. परंतु त्याचा प्लॅन फेल झाला. रेकी करण्यासाठी सुक्खाने सलमान खानच्या सुरक्षारक्षकाशी मैत्री केली होती.
मुंबई पोलिसांनी जून 2024 मध्ये सलमान खान याच्यावर नवी मुंबईतील पनवेल येथील फॉर्म हाऊसच्या मार्गावर हल्ला होणार असल्याचा दावा केला होता. परंतु शूटरचा तो प्लॅन फेल झाला. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग होता.
सुक्खा याला अटक हरियाणातील पानीपतमधून करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पानीपतमधील एका हॉटेलमध्ये त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केले त्यावेळी त्याने मद्यपान केले होते. तो आपला नाव सुद्धा सांगू शकत नव्हता. तसेच ओळख लपवण्यासाठी दाढी वाढवली होती. परंतु पोलीस रेकॉर्डमध्ये असलेल्या फोटोमुळे त्याला अटक करता आली.
चौकशीत सुक्खाने सांगितले की, सलमान खानच्या घरी एप्रिल महिन्यात ज्या लोकांनी गोळीबार केला होता, त्यांना सुक्खाने बंदूक दिली होती. या प्रकरणानंतर अजूनही सलमान खानला धमक्या मिळत आहेत.