बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यापूर्वी सलमान खान यालाही धमकी आली होती. सलमान खान धमकी प्रकरण काळवीट म्हणजे हरीणाशी संबधित होते. आता शाहरुख खान प्रकरणात हरीण कनेक्शन असल्याचे समोर आले. या प्रकरणात ज्या क्रमांकावरुन कॉल आला त्या फैजान खान नावाच्या आरोपीने ही घटना सांगितली आहे. फैजान खान हा छत्तीसगडमधील रायपूर येथील आहे.
‘आजतक’शी बोलताना फैजान म्हणाला, 2 नोव्हेंबर रोजी माझा मोबाइलची चोरी झाली होता. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार दोन समुदायामध्ये तणाव निर्माण करण्याची होती. त्यामुळे मला या धमकी प्रकरणात फसवण्यात येत आहे.
फैजान याने शाहरुख याच्या एक व्हिडिओची लिंक शेअर केली. त्यात त्याने शाहरुखवर गंभीर आरोप लावले. तो म्हणाला, ‘अंजाम’ (1994) हा शाहरुख खान याचा चित्रपट होता. त्या चित्रपटात शाहरुख एका हरिणाची हत्या करतो, असे दृश्य आहे. त्यानंतर त्याचे मास शिजवून आपल्या कर्मचाऱ्यांना खाण्यासाठी देतो. फैजान म्हणतो, हा सीन म्हणजे दोन समुदायामध्ये तणाव निर्माण करणारा प्रकार आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत त्याने आरोप केला की, काही दशतवादी घटकांसोबत शाहरुख याचा संबंध आहे.
बॉलीवुड स्टार सलमान खान धमकीचे हरीण कनेक्शन समोर आले होते. 1998 मध्ये ‘हम साथ-साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान राजस्थानमधील जोधपूरजवळ कळवीटची शिकार केल्याचा आरोप सलमान खान याच्यावर आहे. त्यानंतर बिश्नोई समाज शाहरुखवर नाराज आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. 2018 मध्ये जेव्हा सलमान खान या प्रकरणासाठी कोर्टात आला होता, तेव्हा लॉरेन्स बिश्नाईने त्याला धमकी दिली होती. आता पुन्हा सलमानला धमकी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.
मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची लॉरेन्स गँगने हत्या केली होती. बाबा सिद्दिकी यांनी सलमान खानला मदत केल्यामुळे त्यांची हत्या केलीचे लॉरेन्स गँगने म्हटले होते.