Mahim Crime: माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Dec 26, 2021 | 6:28 PM

या छाप्यात परदेशातून आयात झालेल्या विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या 123 सिलबंद बाटल्या व 18 रिकाम्या बाटल्या असा एकूण 8 लाख 37 हजार 692 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Mahim Crime: माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त
माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त
Follow us on

मुंबई : माहिममध्ये एका बनावट विदेशी मद्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत सुमारे 8 लाख 37 हजार 692 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. झहीर होसी मिस्त्री असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिस्त्रीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कलम 65 (ड) (ई) (फ), 80, 81, 83, 90 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

छाप्यात 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

माहिममधील कासा कोरोलीना इमारतीत बनावट विदेशी मद्य बनविण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात परदेशातून आयात झालेल्या विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व परराज्यातील मद्य अशा एकूण विविध क्षमतेच्या 123 सिलबंद बाटल्या व 18 रिकाम्या बाटल्या असा एकूण 8 लाख 37 हजार 692 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाताळनिमित्त बनावट मद्य विक्री करण्यात येणार होती

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क, ठाण्याचे विभागीय उप-आयुक्त, सुनिल चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा तसेच मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग मुंबई शहर कार्यालयाने केली असून वरील सर्व विदेशी मद्य नाताळ व नववर्षे सणानिमित्त विक्री करण्याचा उद्देश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास विनोद जाधव, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग, मुंबई शहर हे करीत असून जवान एस.एस. जाधव यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली. तथापि बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे. (Destroyed fake foreign liquor factory in Mahim, Liquor worth Rs 8 lakh seized)

इतर बातम्या

धक्कादायक! आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं

Pune crime| यवत पोलिसांची मोठी कारवाई ; दहा लाख रुपये किंमतीचा 167.25 किलोग्रॅम गांजा जप्त; 12आरोपी अटक