मुंबई : मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दहिसर टोलनाक्यावर सोमवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्सी चालकाशी वाद घातला. टॅक्सी चालकाशी वाद झाल्यानंतर टॅक्सी चालक आणि टोल कामगारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या.
सध्या टोल कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्यात काय घडले आणि टोल कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची काच का फोडली याचा तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.
पाहा या घटनेचा व्हिडीओ –
वसईत पोलिसाची दादागिरी
वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कपडा व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका पोलिसाने धक्काबुक्कीकरुन, थापड, बुक्याने मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पोलिसाची पत्नी आणि मित्राचा ही समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत उघड झाले आहे.
ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घडली आहे. याबाबत मारहाण करणारा पोलीस, त्याची पत्नी आणि त्याच्या एका मित्रावर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैदhttps://t.co/6ek88EB25k#Vasai #Police #ShopKeeper #crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2021
संबंधित बातम्या :
यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल