Mumbai Drugs Siezed : मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत, झिम्बाब्वेहून आलेली महिला अटक

| Updated on: Feb 14, 2022 | 1:33 AM

महिलेने हे ड्रग्ज आपल्या ट्रॉली बॅग आणि फाईल फोल्डरमध्ये लपवले होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 60 कोटी रुपये आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे.

Mumbai Drugs Siezed : मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत, झिम्बाब्वेहून आलेली महिला अटक
मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत
Follow us on

मुंबई : झिम्बाब्वेहून मुंबईत आलेल्या एका महिलेकडून कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) 6 किलो हेरॉईन आणि 1.480 ग्राम एमडी ड्रग्ज हस्तगत (Drugs seized) केले आहे. एअर इंटेलिजन्स युनिट (AIU)ने 12 फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली आहे. विमानतळावर आरोपी महिलेच्या सामानाची तपासणी करताना हे ड्रग्ज सापडले. महिलेने हे ड्रग्ज आपल्या ट्रॉली बॅग आणि फाईल फोल्डरमध्ये लपवले होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 60 कोटी रुपये आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे. (Drugs worth Rs 60 crore seized at Mumbai airport, woman from Zimbabwe arrested)

या कारवाईबद्दल बोलताना कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, “अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्धची आमची मोहीम सुरू ठेवत, कस्टमच्या एआययू अधिकाऱ्यांनी शनिवारी हरारेहून आलेल्या एका झिम्बाब्वेच्या महिला प्रवाशाला रोखले. ती 7006 ग्रॅम पिवळी पावडर “हेरॉईन” आणि 1480 ग्रॅम “हेरॉईन” आणि “मेथॅम्प” चे मिश्रण व्हाईट क्रिस्टल ग्रॅन्युल आढळले, अशी माहिती कस्टमच्या एका अधिकाऱ्याने दिली. कस्टम्स अधिकारी महिलेकडून ड्रग्ज पुरवठादार आणि ग्राहकाची चौकशी करत आहेत.

अलीकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश झाला. 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24.76 कोटी रुपयांच्या हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी जोहान्सबर्गहून मुंबईला दोहामार्गे जाणाऱ्या आई-मुलीच्या जोडीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली. हेरॉईन चतुराईने ट्रॉली बॅगेच्या पोकळीत लपवून ठेवले होते. दुसरी कारवाई 23 सप्टेंबर रोजी AIU अधिकार्‍यांनी आदिस अबाबा, इथिओपिया येथून आलेल्या 42 वर्षीय झांबियातील महिला प्रवाशाकडून 18 कोटी रुपये किमतीचे 3.5 किलोग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. ड्रग्जची पाकिटे चतुराईने प्रवाशाच्या बॅगेच्या पोकळीत लपवून ठेवली होती. यानंतर 22 नोव्हेंबर 2021 रोजी AIU अधिकार्‍यांनी 20 कोटी रुपयांच्या 3.91 किलोग्रॅम हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी युगांडातील दोन महिलांना अटक केली होती. आरोपींनी सुदानमधून मुंबईत ड्रग्जची तस्करी केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Drugs worth Rs 60 crore seized at Mumbai airport, woman from Zimbabwe arrested)

इतर बातम्या

Murder | फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?

जंगलात दोन वाघांची झुंज, घडला हा भलताच प्रकार, दोघांच्या झुंजीत…