मुंबई : राज्यात ईडीच्या (ED Raids) कारवाईची धास्ती आता क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनीही घेतली आहे. कारण ईडीने क्रिप्टो (Crypto currency) करन्सीची सेवा देणाऱ्या तब्बल पाच कंपन्यांवर छापेमारी केलीय. या कंपन्यांच्या माध्यामातून तब्बल 1 हजार कोटी रुपयांचं मनीलॉड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे क्रिप्टो करन्सीची सेवा देणाऱ्या कंपन्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही वर्षांत क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या (Crypto investors) संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यानंतर आता ईडीने क्रिप्टो करन्सीशी संबंधिक कंपन्यांवर बारीक नजर ठेवली आहे. गेल्या 25 दिवसांत ईडीने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून मनॉ लॉड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. त्याअनुशागने आता पुढील तपास केला जातोय. एकूण तीन मोठ्या कंपन्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 ऑगस्ट रोजी ईडीने वझीरेक्स नावाच्या एका कंपनीवर छापेमारी केली होती. मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करण्यात आलेली होती. या छापेमारीदरम्यान, 64 कोटी 67 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. मोबाईल ऍपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्या आमि क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांची मिलिभगत असल्याचं ईडीच्या तपासातून दिसून आलंय. त्यानंतर ईडीने वझीरेक्स, कॉईनस्वीच कुबेर, प्लिमव्होल्ट या अन्य तीन मोठ्या कंपन्यावरही छापेमारी केलीय.
या छापेमारीनंतर महत्त्वाचे खुलासे तपासातून होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या तपासात बहुतांश कंपन्यांचे मालक हे चिनी असल्याचं दिसून आलंय. कर्ज देणाऱ्या मोबाईल ऍप कंपन्या यांचा क्रिप्टोशी संबंध असल्याचं दिसून आल्यानं आता सखोल तपास केला जातोय. एकूण 600 कंपन्यांना ईडीने नोटीस जारी केलीय. या कंपन्यांची चौकशीही सुरु आहे. गेल्या महिन्याभरात करण्यात आलेल्या कारवाईने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारेही धास्तावलेत. मोबाईल ऍपमधून कर्ज दिल्यानंतर त्यातून जो फायदा होतो, तो चिनी मालकांना पोहोचवण्यासाठी क्रिप्टोचा सर्रास वापर होत असल्याच्या कारणाने अनेक क्रिप्टो कंपन्यांवर आता बारीक नजर ठेवली जातेय.