100-crore bribery case : ‘अनिल देशमुखांबाबत ठाकरेंसह शरद पवारांनाही सांगितलेलं’ परमबीर सिंहांचा CBIला सनसनाटी जबाब

| Updated on: Jun 21, 2022 | 7:44 AM

Param Bir Singh on Sachin Vaze Case : सीबीआयनं 100 कोटी वसुलीप्ररकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आता परमबीर सिंह यांचा जबाबही जोडण्यात आलेला आहे.

100-crore bribery case : अनिल देशमुखांबाबत ठाकरेंसह शरद पवारांनाही सांगितलेलं परमबीर सिंहांचा CBIला सनसनाटी जबाब
धक्कादायक जबाब...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी खळबळजनक उत्तरं सीबीआय (CBI) चौकशीत दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन वाझे, अनिल देशमुख हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे. सचिन वाझेला (Sachin Vaze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी खुद्द अनिल देशमुखांनी दबाव आणला, असं परमबीर सिंह यांनी म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आणि इतर मंत्र्यांना अनिल देशमुख यांच्याबाबत माहिती दिली होती आणि त्या नेत्यांनी देशमुखांच्या गैरव्यवहारांबद्दलची जाणीव असावी, असं परमबीर सिहांनी सीबीआयला दिलेल्या जबाबमध्ये म्हटलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत रुजू करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव आणला, असा जबाब त्यांनी सीबीआयला दिला.

सीबीआयनं 100 कोटी वसुलीप्ररकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आता परमबीर सिंह यांचा जबाबही जोडण्यात आलेला आहे. तर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याप्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आलाय. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर शरद पवार यांनाही याबाबत सांगितल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलंय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. शिवाय त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब आणि जयंत पाटील यांनाही देशमुखांच्या कृत्याबाबत माहिती दिल्याचं सिंह यांनी जबाबबात म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

नेमकं जबाबात परमबीर सिंह काय म्हणाले?

वाझे याला पुन्हा पोलीस दलात का नियुक्त करण्यात आलं, अता प्रश्न सीबीआय चौकशीत परमबीर सिंह यांना विचारण्यात आलेला होता. त्याला उत्तर देताना परमबीर सिंह यांनी म्हटलंय, की…

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक सुरा चौहान यांनी भेट घेतली होती आणि वाझे याला पुन्हा नियुक्त करण्यातासाठी दबाव टाकला होता. मी याबाबत खुद्द आदित्य ठाकरेंशीही बोललो होते. तर त्यांनी मला याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायचा सांगितलं. पण त्यांनी आणि देशमुखांनी वाझेला पुन्हा सेवेस सामावून घेण्यासाठी दबाव टाकला होता. शरद पवारांसह अजित पवार, अनिल परब, जयंत पाटील यांनी मी देशमुखांच्या कृत्यांबाबत कल्पना दिली होती. पण मी मुख्यमंत्री, पवार आणि इतर मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे गैरप्रकाराची माहिती दिली म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवला. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी माझ्यावर अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणी चूक झाल्याचा खोटा आरोप केला.

‘ते माझे गृहमंत्री…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुखांबाबत केव्हा माहिती देण्यात आली, याचा तारखेसह उल्लेखही परमबीर सिंहांनी केलाय. मुख्यमंत्र्याची मार्च 2021 मध्ये आणि त्याआधी त्यांनी भेट घेतली होती. तेव्हा गृहमंत्र्यांच्या दुष्कृत्याबाबत माहिती दिली होती. वर्षा बंगल्यावर 4 मार्च ते 15 मार्च दरम्यान, बैठक झाली होती. मी त्यावेळीही मुख्यमंत्र्यांना जेव्हा याबाबत सांगितलं तेव्हा ते इतकंच म्हणाले, की ते माझे गृहमंत्री आहेत, असा जबाब परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिलाय.

किंग म्हणजे पोलीस आयुक्त?

दरम्या, एसीपी संजय पाटील यांचा जबाब देखील सीबीआयने आरोपपत्रात जोडलाय. त्यातही एक महत्त्वाची बाब अधोरेखित झालीय. वाझे यांच्याकडे नंबर एकची विचारणा केली असता, त्यांनी पोलीस आयुक्त असं उत्तर दिलं होतं. मात्र वायरलेसद्वारे साधल्यात येणाऱ्या संवादात पोलीस आयुक्तांचा उल्लेख किंग असा करण्यात येतो, असं संजय पाटील यांनी जबाबामध्ये म्हटलंय.