मुंबई : ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau) उर्फ विकास पाठक हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर हिदुस्थानी भाऊच्य सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होतेय. (Hindustani appeal for children to come together for brother’s release, audio clip goes viral)
मी अमान बोलतोय ग्रुपचा अॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली वकिलांकडे इथे भाऊ नाहीत. भाऊना निघून अर्धा ते पाऊण तास झालाय. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येने धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत. तेथे मीडिया पण आहे. आपली मैत्रीण, आपल्या बहिणी सर्वांना घेऊन या. जास्तीत जास्त विद्यार्थांना घेऊन या. कृपया सपोर्ट करा. लवकरात लवकर पोहचा, असे आवाहन या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे.
सोमवारी अचनाक मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर घेराव घातला. हे आंदोलन एवढं तीव्र होतं की पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कसे जमले ? कुठून आले हे विद्यार्थी याचा शोध घेत असताना पोलिसांना हिंदुस्थानी भाऊचं नाव कळलं. आंदोलनाच्या वेळी हिंदुस्थानी भाऊ तिथे आला होता. मात्र पोलिसांनी त्याला तिथे थांबू दिलं नाही. पोलिसांनी या हिंदुस्थानी भाऊला बाहेर काढल्यानंतर आंदोलन अधिकच आक्रमक झाले होते. (Hindustani appeal for children to come together for brother’s release, audio clip goes viral)
इतर बातम्या
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने
Hindustani Bhau : टपाटप? टपाटप? 3 दिवसांची पोलीस कोठडी, हिंदुस्तानी भाऊसोबत पोलीस काय करणार?