Sakinaka Case : साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून मुंबई पोलिसांचे कौतुक

| Updated on: Jun 02, 2022 | 6:16 PM

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा 10 मिनिटे इतका जलद होता.

Sakinaka Case : साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून मुंबई पोलिसांचे कौतुक
गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून मुंबई पोलिसांचे कौतुक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अंधेरी साकीनाका येथील 32 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यनिमित्ताने व्यक्त केली. पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यामुळेच न्याय प्रक्रियेला गती

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा 10 मिनिटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली.

काय आहे प्रकरण ?

अंधेरीतील सकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 रोजी एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. मध्यरात्री 3.30 वाजता पोलिसांना एक महिली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला राजावाडी रुग्णालयात नेले. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पेशाने चालक असलेल्या मोहन चौहान याने सदर महिलेवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हत्यार टाकून तिला गंभीर जखमी केले होते. यानंतर घटनास्थळावरुन आरोपीने पळ काढला. गंभीर जखमी महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यानंतर अवघ्या 18 दिवसात पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुरावे जमा करुन दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी बुधवारी 1 जून 2022 रोजी सुनावणी पूर्ण झाली. यावेळी पोलिसांनी आरोपीला जगण्याचा अधिकार नसून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आज न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

हे सुद्धा वाचा