कल्याण (ठाणे) : या जगात अनेक गोष्टी अशा असतात की, ज्या घडणं है नैसर्गिकरित्या बंधनकारक असतं. प्रत्येक सकाळी सूर्य उगवणं गरजेचं आहे. नद्यांना वाहत राहणं गरजेचं असतं, समुद्रात उसळणाऱ्या लाटांना किनाऱ्यावर येणं जरुरीचं आहे. कारण तो नियम निसर्गाचा आहे. तो सर्वांसाठी सारखा आहे. निसर्गाच्या या नियमाप्रमाणे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या बाळाचं पालनपोषण करण्याचं कर्तव्य आहे. विशेष म्हणजे हे एकप्रकारे सामाजिक कर्तव्य देखील आहे. समाजाचा संतोल ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापलं कर्तव्य बजावत जबाबदार राहणं आवश्यक आहे. पण कल्याणमध्ये तर एक विचित्रच घटना समोर आलीय. कर्जाचा बोझा झाला म्हणून एका दाम्पत्याने निसर्ग नियमांना छेद देवून आपलं पाच महिन्यांचं लहान बाळ एका एजंट महिलेला विकण्याचा प्रयत्न केला (parents selling their five-month-old baby to agent woman).
नेमकं प्रकरण काय?
राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात शहाडला वास्तव्यास असेलेले साईनाथ भोईर आणि त्यांच्या पत्नी पल्लवी भोईर हे प्रचंड कर्जबाजारी झाले. साईनाथ यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लॉकडाऊन काळात त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा झाला. तसेच लॉकडाऊनमुळे रिक्षाचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे पत्नी मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना सतावित होता. या विवंचनेतून त्यांच्या संपर्कात एक मानसी जाधव नावाची महिला आली (parents selling their five-month-old baby to agent woman).
महिला एजंट मानसी जाधव नेमकी कोण?
मानसी जाधव ही बदलापूरला राहते. मानसी जाधव ही एका सामाजिक संस्थेत नोकरी करायची. या क्षेत्रात चांगले पैसे मिळतील म्हणून ती या क्षेत्रात आली. पण ती तर मानव तस्करच निघाली. मानसी हिने साईनाथ भोईर यांना त्यांचा पाच महिन्याचा मुलगा विकणार का? असा प्रश्न विचारला. यासाठी तिने त्यांना काही वेळ विचार करायलाही दिला. भोईर दाम्पत्यावर कुटुंबाचा कर्जाचा बोझाच एवढा झाला होता की त्यांनी देखील तो पर्याय स्वीकारला. त्यांनी अवघ्या 90 हजार रुपयात आपल्या पाच महिन्याच्या बाळाला विकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मानसी ते बाळ पुढे 2 लाखात विकणार होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.
अचानक पोलिसांचा कारवाई, रंगेहाथ पकडलं
मानसी कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या दीपक हॉटेल येथे भोईर दाम्पत्याकडून पाच महिन्याच्या बाळासा विकत घेणार होती. भोईर पती-पत्नी आणि मानसी तिथे दाखलही झाले. पण नेमकं त्याचवेळी तिथे पोलीस दाखल झाले. पोलीस मानसीकडे नजर ठेवूनच होते. त्यांनी सापळा रचत तिला आणि भोईर दाम्पत्याला रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे महिला एजंट मानसी जाधव हिने आतापर्यंत किती गरीब कुटुंबियांच्या गरिबीचा फायदा घेत अशी किती मुले विकत घेतली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
पोलिसांना सुगावा कसा लागला आणि कारवाई कशी केली?
ठाणे मानवी तस्करी विरोधी विभागाचे प्रमुख अशोख कडलक यांना माहिती मिळाली की, बदलापूर येते राहणारी मानसी जाधव ही महिला एका गरीब कुटुंबांतील पाच महिन्याच्या मुलाला विकत घेत आहे. अशोक कडकल यांच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल येथे सापळा रचला. मुलाचे वडिल साईनाथ भोईर आई पल्लवी भोईर आणि महिला एजंट मानसी जाधव याना रंगेहाथ अटक केली. या तिघांना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एपीआय सचीन पत्रे करीत आहेत. या तिघांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!