मुंबई : मुंबई (Mumbai) आणि राज्यातील इतर भागामध्ये आयकर चोरीप्रकरणात आयकर विभागाच्यावतीने (income tax department) धाडसत्र सुरू आहे. आज मुंबईतील मालाडच्या (malad) दफ्तरी मार्गावर असलेल्या एका इमारतीमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपचे मुख्य कार्यालय आहे. युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपच्या कार्यालयावरच आयकर विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.युनिव्हर्सल एज्युकेशनचे सर्वेसर्वा जेसस लाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या छाप्यात आयकर विभागाच्या हाताला नमेकं काय लागलं हे अद्याप समोर आलेले नाही. गेल्या तीन दिवसांपासून युनिव्हर्स एज्युकेशनच्या कार्यालयांवर कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कर चोरी प्रकरणात मालाड स्थित युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांच्या वतीने मिळत आहे. युनिव्हर्सल एज्युकेशनचे सर्वेसर्वा जेसस लाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या छाप्यात आयकर विभागाच्या हाताला नमेकं काय लागलं हे अद्याप समोर आलेले नाही. गेल्या तीन दिवसांपासून युनिव्हर्स एज्युकेशनच्या कार्यालयांवर कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान दुसरीकडे युनिव्हर्सल एज्युकेशनच्या मुख्य कार्यालयासोबतच मुंबईतील अन्य बारा ठिकाणी देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तर राज्यातील ठाणे , वसई ,नाशिक ,औरंगाबाद , मीरा भायदंरसह इतर अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. आयकर विभागाकडून अचानक धाडसत्र सुरू झाल्याने टॅक्स चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
धक्कादायक : औरंगाबादेत रुग्णालयाच्या पायरीवरच रुग्णाचा तडफडून मृत्यू, गंगापूर तालुक्यात खळबळ
Pimpri Chinchwad crime | पिंपरीत नराधम बापच अल्पवयीन मुलीसोबत करत होता … ; आईने उचलेले ‘हे’ पाऊल