मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी आणि आर्यन खान अटकेप्रकरणात वादग्रस्त ठरलेले एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दणका दिलाय. आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. वानखेडे यांच्या जागी आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंग आता प्रकरणाचा तपास करणार आहेत. ओडिशा केडरचे IPS संजय सिंह यांची NCB (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) चे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय हे 1996 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) ओडिसाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही पाहिले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली एनसीबी कार्यालयात बदली झाली होती. सिंग यांनी ओडिशा राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ओडिसामध्ये पोलिस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्स (डीटीएफ) चे प्रमुख असताना सिंग यांनी राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यानंतर संजय सिंग यांना सरकारने बढती देत दिल्ली कार्यालयात बदली केली होती. त्यांनी ओडिसामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते. एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) संजय कुमार सिंग (IPS) यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) आदेशानुसार, सिंह यांची नियुक्ती प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते एनसीबीचे उपसंचालक म्हणून काम पाहतील.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. दिल्ली झोनमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. (Know who is Sanjay Singh investigating the Aryan Khan case)
इतर बातम्या
VIDEO | कल्याणमध्ये परंपरेच्या नावाखाली बैलांसोबत जीवघेणा खेळ, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
जांभळाच्या झाडाला तरुणाचा गळफास, शेजारी रिकामा फास, ऐनवेळी कोणी माघार घेतली?