मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात सिप्झ कंपनीच्या समोर रस्त्यावर पार्किंग केलेल्या बुलेट बाईक चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकला आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईत कोरोना काळात खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. मुंबईत काम करणारे कर्मचारी आपापल्या खासगी गाड्या घेऊन कामावर जायचे, मात्र अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिप्झ कंपनीच्या आतमध्ये जागा नसल्यामुळे समोरच्या रस्त्यावर आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग करायचे.
चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
या पार्किंग मधून एमआयडीसी परिसरात राहणारा अब्दुल कादर सलीम (वय चाळीस वर्ष) या सराईत चोरट्याने बुलेट बाईक चोरी करतानाचे दृश्य तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेज साधाराने एमआयडीसी पोलिसांनी या सराईत चोरट्याला अमरावतीमधून अटक केली आहे.
अमरावतीत बाईक चोरी
हा बाईक चोर मुंबईमधून बाई चोरी करून अमरावतीमध्ये लोकांना बँकेची गाडी असल्याचं सांगून विकत होता. मात्र या चोरट्याकडून एमआयडीसी पोलिसांनी 6 पेक्षा जास्त बुलेट बाईक रिकव्हर केल्या आहेत. मात्र या आरोपीने मुंबईत आणखी कुठल्या भागामध्ये अशा पद्धतीने चोरी केली आहे का, या चोरीमध्ये त्याचे आणखी काही साथीदार आहेत का, याची सखोल चौकशी एमआयडीसी पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या
‘पप्पांनी एका माणसाला मारुन जमिनीत पुरलं’, 13 वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात तक्रार