मुंबई : मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्यवसाय (Drugs) करणाऱ्या बंटी आणि बबलीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 295 ग्रॅम हेरॉईन (Mumbai Crime News) जप्त केले असून, त्याची किंमत 35 लाख 40 हजार इतकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी दहिसरच्या अंबावाडी परिसरात राहतात, दोघेही ड्रग्जची खरेदी-विक्री करतात. त्यांच्यावर यापूर्वीही अमली पदार्थांची विक्री (Heroin Smuggling) केल्याचा आरोप आहे.
झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे डीसीपी पथकाच्या एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनीत छापा टाकला, त्यात जमीर बाबू मुजावर आणि फरजाना जमीर मुजावर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या घरातून 295 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 35 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.
हे दोघे पती-पत्नी दीर्घकाळापासून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत होते. पोलिसांनी सांगितले की, दोघेही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंबावाडी रेल्वे मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करायचे. त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा पोलीस, एमएचबी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत ७ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
संंबंधित बातम्या :
मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक
Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला
कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड