VIDEO | पोस्टात पैसा जमा करण्याच्या नावाखाली गंडा, पती-पत्नीला गुजरातमधून अटक

| Updated on: May 11, 2022 | 11:25 AM

पोस्टात पैसे जमा करण्याच्या नावाखाली एका जोडप्याने शेकडो जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 200 हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

VIDEO | पोस्टात पैसा जमा करण्याच्या नावाखाली गंडा, पती-पत्नीला गुजरातमधून अटक
मुंबई पोलिसांकडून दाम्पत्याला अटक
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मुंबई : पोस्टात पैसे (Post Office) जमा करण्याच्या नावाखाली फसवणूक (Cheating) करणाऱ्या जोडप्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी (Mumbai Crime News) ही कारवाई केली. गुजरातमधील सुरत येथे जाऊन दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. दोनशेहून अधिक महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे आहे. मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि खासगी कंपन्यांमध्ये पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली दोघांनी गुंतवणूकदारांची लूट केल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

पोस्टात पैसे जमा करण्याच्या नावाखाली एका जोडप्याने शेकडो जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 200 हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथे जाऊन दाम्पत्याला पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि खासगी कंपन्यांमध्ये पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली दोघांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

हे सुद्धा वाचा

दहा वर्ष पोस्टात काम केल्याची थाप

हे दोघेही सुमारे पाच वर्षे पैसे जमा करण्याच्या बनावट स्लिप देऊन लोकांची फसवणूक करत होते. उर्वसी पटेल नावाच्या महिलेने पोलिसांना सांगितले की, मनीष चौहान आणि वंदना चौहान यांनी तिला सांगितले होते की, दोघेही पोस्ट ऑफिसमध्ये 10 वर्षे काम करतात.

ते लोकांच्या पैशाची मुदत पोस्टात ठेवतो आणि त्याला चांगला परतावा मिळतो. आतापर्यंत 200 हून अधिक महिलांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. ज्यांची या दोघांनी मिळून फसवणूक केली आहे.