बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, मुंबईत 30 वर्षीय नवऱ्याला अटक

| Updated on: Jan 14, 2022 | 3:22 PM

आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. काही महिन्यांपूर्वी ती घर सोडून गेली, तेव्हा नवऱ्याने सासरी परत न आल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, मुंबईत 30 वर्षीय नवऱ्याला अटक
CRIME
Follow us on

मुंबई : आपल्याच बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस (WhatsApp Status) ठेवणाऱ्या नवऱ्याला बेड्या पडल्या आहेत. बायको माहेरुन सासरी येण्यास नकार देत असल्याने नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. मुंबईजवळच्या भिवंडी भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. संबंधित 30 वर्षीय तरुणाने पत्नी आंघोळ करताना तिचे व्हिडीओ (Wife Bathing Video) शूटिंग केले होते. ही क्लीप त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर बायकोने मुंबईतील मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय महिलेने 2015 मध्ये भिवंडीतील एका तरुणाशी लग्न केले होते. त्यांना जुळी मुलंही आहेत. महिलेच्या लग्नात तिच्या वडिलांनी जवळपास 12 लाख रुपये खर्च केले होते आणि 5 लाखांहून अधिक किमतीचे दागिनेही दिले होते, तरीही तिच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते आणि फ्लॅटची मागणी करत असल्याचा आरोप आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने दोन वेळा घर सोडले. अखेर कुरार येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे ती आली होती.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

तिने सासरच्या मंडळींविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटलाही दाखल केला, मात्र तिच्या पतीने तिला ही केस मागे घेण्यास तयार केले, असे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी जानेवारीत एके दिवशी जेव्हा दोघे ठाण्यात एकत्र राहत होते. तेव्हा आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. काही महिन्यांपूर्वी ती घर सोडून गेली, तेव्हा नवऱ्याने सासरी परत न आल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

गेल्या आठवड्यात पीडितेच्या लहान बहिणीने आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ताई आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाहिला आणि तिला सांगितलं. त्यावेळी पीडितेने तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 498A (महिलेसोबत क्रौर्य), 506, 2 (गुन्हेगारी धमकी) यासह कलम 67A आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे, असे कुरार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

पंढरपूरमध्ये ‘मिर्झापूर’, माझ्या मुलामुळे दिवस जात नाहीत, तर माझ्याशी संबंध ठेव, सासऱ्याची सुनेवर बळजबरी

आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ, पोलीस कॉन्स्टेबलकडून ब्लॅकमेलिंग

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप