जम्पिंग मशिनवरील उडी जीवघेणी, सातव्या मजल्यावरुन पडून नवी मुंबईत बालकाचा मृत्यू

| Updated on: Feb 23, 2022 | 9:16 AM

बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे 13 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना हा अपघात झाला.

जम्पिंग मशिनवरील उडी जीवघेणी, सातव्या मजल्यावरुन पडून नवी मुंबईत बालकाचा मृत्यू
नवी मुंबईतील इमारतीतून पडून मुलाचा मृत्यू
Follow us on

नवी मुंबई : सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एका लहान बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर (Jumping Machine) खेळत असताना हा अपघात झाला. बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन पडल्याने 13 वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. ही घटना नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये (Vashi Navi Mumbai) उघडकीस आली आहे. ईशान गुप्ता असं या दुर्घटनेत मृत्युमुखी (Accident) पडलेल्या मुलाचं नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उंच इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिन का ठेवण्यात आली होती, ती ऑपरेट करण्यासाठी कोणी वयस्क व्यक्ती का नव्हती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नेमकं काय घडलं?

बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे 13 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना हा अपघात झाला. मयत ईशान गुप्ता हा नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील महाराणी सोसायटीत राहत होता. तसेच इयत्ता नववीत शिकत होता.

जम्पिंग मशिनवर एकट्याचा खेळ

सोमवारी रात्री ईशान हा आपल्या इमारतीच्या टेरेसवर खेळण्यासाठी गेला होता. यावेळी टेरेसवर इमारतीतील दोघे व्यक्ती वॉकिंगही करत होते. तर ईशान हा टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशिनवर एकटाच खेळत होता.

तोल गेल्याने टेरेसवरुन खाली

यावेळी ईशान याने जम्पिंग मशिनवरुन उडी घेतली, मात्र त्याला स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने, तो टेरेस वरुन खाली पडून गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ईशानला तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

उंच इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिन का ठेवण्यात आली होती, ती ऑपरेट करण्यासाठी कोणी वयस्क व्यक्ती का नव्हती, ही हलगर्जी कोणी बाळगली, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्यातील मटका व्यावसायिकाची साताऱ्यात हत्या, इमारतीच्या छतावर मृतावस्थेत

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी

सेल्फी काढताना तोल गेला, इमारतीवरुन पडून भिवंडीत 13 वर्षीय मुलाचा मृत्यू