नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वडघरमध्ये राहणाऱ्या महिलेने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (Shiv Sena) रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला घरकाम करत असून पतीपासून विभक्त राहते. या महिलेचे आणि तिच्या एका मित्राचे खाजगी फोटो बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेले असताना गलिच्छ भाषेत बोलत धक्काबुक्की केल्याची तक्रार महिलेकडून नोंदवण्यात आली.
शिवसेना रायगड जिल्हा सल्लगार बबन पाटील आणि खारघर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडघरमध्ये राहणाऱ्या महिलेने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार महिला घरकाम करत असून, पतीपासून विभक्त असलेल्या या महिलेचे आणि तिच्या एका मित्राचे खाजगी फोटो जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले होते.
याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या या महिलेसोबत माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी गलिच्छ भाषेत बोलत धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी या महिलेचे आणि तिच्या मित्राचे फोटो बॅनरवर लावून बदनाम करण्याची धमकी देखील दिली असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक