मुंबई : करी रोड येथील अविघ्न पार्क या 60 मजली इमारतीला आज भीषण आग लागली आहे. अनेक लोक आगीत अडकल्याची माहिती आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्यानंतर जीव स्वतःचा वाचवण्याचा प्रयत्न करताना एक व्यक्ती पडला आहे. यावर महापौरांनी प्रतिक्रिया दिली आहे. इमारतीत तैनात सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच गाद्या, चादरी घालून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले असते तर त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नसती असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mayor Kishori Pednekar reaction on avighna park fire and injury)
आगीत किती लोक जखमी झाले याची अद्याप माहिती मिळाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच दहाव्या मिनिटाला आम्ही पोहोचलो आहे. इथे एक व्यक्ती लटकत होती. ही अविघ्न पार्क म्हणजे फार मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. आणि हायप्रोफाईल सोसायटीमध्ये 200 च्या वर सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा कर्मचारी आहेत. तो व्यक्ती हात पकडून वर लटकत होता, त्याला वाचवण्यासाठी ट्रेनिंग पाहिजे होतं ते मला दिसलं नाही. त्यांनी लगेच गाद्या घातल्या असत्या, लगेच मोठ्या प्रमाणावर चादरी घातल्या असत्या त्याला कँच करण्यासाठी तर त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्जुरी झाली नसती, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं. मात्र त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही
करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही. (Mayor Kishori Pednekar reaction on avighna park fire and injury)
इतर बातम्या
पुणे विद्यापीठ चौकातली कोंडी कशी फुटणार? अजित पवारांनी पुलासह मेट्रोचाही प्लॅन सांगितला