मुंबई : नुकतीच मुंबईमध्ये पोलिसांनी पॉर्न फिल्म बनवणाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली होती. एका फ्लॅटमध्ये वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न फिल्म बनवल्या जात होता. या पॉर्न फिल्ममधील हिरोला पोलिसांनी अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र या पॉर्न फिल्मची डायरेक्टर आणि प्रोड्यूसर असणारी महिला मात्र फरार आहे. शिवाय इतक स्टाफही फरार असल्याचं माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सध्या पुढील तपास केला जातो आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटलीय. शिवाय तो ज्या महिलेच्या दिग्दर्शनाखाली या फिल्ममध्ये काम करत होता, तिचा फोटो आणि तिचं नावही समोर आलंय.
चारकोप पोलिसांनी मालाड पश्चिमेला एका इमारतीच्या फ्लॅटवर धाड टाकली होती. या फ्लॅटमध्ये वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न फिल्म तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत भाबरेकर नगर येथील इमारतीच्या फ्लॅटमध्ये धाड टाकली.
या कारवाईमध्ये अनिरुद्ध जांगर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिरुद्ध हा पॉर्न फिल्मचा हिरो म्हणून काम करत होता. तर यास्मिन खान ही या फिल्मची डायरेक्टर आणि प्रोड्यूसर होती. यास्मिन खान हिच्यासह अन्य तिघे आरोप सध्या फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
याप्रकरणी एका मॉडेलनं तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार महिलेनं अनेक कपड्यांच्या जाहिराती देखील केल्या आहेत. चारकोप पोलिसांकडून पॉर्न फिल्म प्रकरणी आता कसून तपास केला जातोय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीशिवाय आणखी एक जण नायक म्हणून पॉर्न फिल्ममध्ये काम करत होता. तर एक कर्मचारीही त्यांना मदत करायचा. सध्या हे दोघे आणि डायरेक्टर, प्रोड्यूसर महिला फरार आहे. फोटो आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांकडून फरार आरोपींची शोध सुरु आहे.
धक्कादायक बाब म्हणजे फरार यास्मिन खान या महिलेला राज कुंद्रा प्रकरणातही अटक करण्यात आली होती. ही या महिलेला झालेली पहिलीच अटक होती. पण नंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर या फरार महिलेनं पुन्हा एकदा पॉर्न फिल्म बनवण्यास सुरु केल्याचीही माहिती समोर आली आहे. आता या महिलेला नेमकी अटक केव्हा होते, हे पाहणं महत्त्वाचंय.