कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रदीप शर्मा यांची आठवी अटक आहे. (Mumbai Crime Former Mumbai Police officer Encounter Specialist Pradeep Sharma arrested by NIA)
आतापर्यंत किती जणांना बेड्या?
1. सचिन वाझे
2. विनायक शिंदे
3. रियाझ काझी
4. सुनील माने
5. नरेश गोर
6. संतोष शेलार
7. आनंद जाधव
8. प्रदीप शर्मा
प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ताब्यात घेतल्यानंतर NIA ने त्यांना दुपारी अटक केली. आता NIA प्रदीप शर्मांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
शर्मांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख
मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी
113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे
शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव
1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते
लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती
2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले
प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं
2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती
संबंधित बातम्या :
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक
जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर
(Mumbai Crime Former Mumbai Police officer Encounter Specialist Pradeep Sharma arrested by NIA)